mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वडिलांच्या डोळ्यादेखत 4 मुले गेली नदीत वाहून, शोधकार्य सुरू; सोलापूर जिल्ह्यातील घटना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 30, 2021
in सोलापूर
मंगळवेढा तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.धनंजय सरवदे यांची नियुक्ती; डॉ.नंदकुमार शिंदे यांची बदली

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावात आज दुपारच्या सुमारास एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. नदीत पोहोण्यासाठी गेलेली चार मुले वडिलांच्या डोळ्यादेखत वाहून गेली.

वाहून गेलेल्या चौघांमध्ये तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. मुले वाहून गेल्याची माहिती मिळताच तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांकडून या मुलांचा शोध सुरू आहे.

काल दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास लवंगी गावात राहणारे शिवाजी रामलिंग तानवडे हे भीमा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते.

समीक्षा शिवाजी तानवडे (वय 13, इयत्ता आठवी), अर्पिता शिवाजी तानवडे (वय 12, इयत्ता 7 वी), आरती शिवानंद पारशेट्टी (वय 12, इयत्ता 7 वी) आणि विठ्ठल शिवानंद पारशेट्टी (वय 10, इयत्ता 5 वी) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

शनिवारी दुपारी 3:30 वाजता शिवाजी रामलिंग तानवडे (वय 40, रा. लवंगी, ता. द. सोलापूर) हे भीमा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. थोड्या वेळाने त्यांच्या पाठीमागे तिच्या दोन मुली समीक्षा व आर्पिता तर त्यांच्या सोबत मेव्हण्याचा मुलगा विठ्ठल व मुलगी आरती असे चौघे नदीकडे गेले.

शिवाजी यांनी त्यांना घराकडे पाठवून दिले. शिवाजी हे पोहत नदीमध्ये आत गेले असताना थोड्या वेळाने ते चौघे परत नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले. मुलगी समीक्षा हिला पोहता येत होते. परंतु अर्पिताला पोहता येत नव्हते. त्यावेळी ते चौघे नदीपात्रात अंघोळीसाठी उतरले. समीक्षा हिस पाण्यात पोहत असताना आरतीने पकडले व अर्पिता हीस विठ्ठल याने पकडल्याने ते चौघे बुडू लागले.

यावेळी त्यांचा आवाज ऐकून शिवाजी लगेच त्यांच्याजवळ पोहत जाऊन समीक्षा व आरती यांना थोडेसे बाजूला किनार्‍याजवळ सोडले. अर्पिता व विठ्ठल यास सोबत कडेला आणत असताना पाहिले असता समीक्षा व आरती या पाण्याच्या प्रवाहामुळे पुन्हा बुडाल्या. त्यावेळी शिवाजी यांच्या हातातील विठ्ठल व अर्पिता पण निसटले व ते पण बुडाले.

त्यावेळी शिवाजी यांचा ही धीर सुटल्याने तेही बुडू लागले. त्यावेळी त्याचे नातेवाईक राचाप्पा उर्फ अप्पू संगप्पा पारशेट्टी याने शिवाजी रामलिंग तानवडे यास बाहेर काढले. दरम्यान, उजनीचे पाणी सोडल्याने दूथडी भरून वाहणार्‍या भीमा नदीच्या पाण्यात बुडालेल्या या मुलांचा रात्री उशाशिरापर्यंत शोध सुरू होता.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

‘सभा मंडप नको, रस्ते, पाणी आणि शाळा द्या!’ : मंगळवेढ्यात ग्रामस्थांची बदलती मानसिकता; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, चाऱ्याला प्राधान्य देण्याची मागणी

October 31, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकरी अन् नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; दुष्काळी ‘वॉर रूम’ सुरू, ६ अधिकाऱ्यांची नियुक्ती; ‘या’ क्रमांकांवर संपर्क साधा

November 2, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

खतांसाठी रांगा विसरा, मोबाईलवरूनच घरबसल्या करा बुकिंग; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

October 29, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राष्ट्रीय जंतनाशक दिनी सोलापूर जिल्ह्यात ८ विद्यार्थ्यांना गोळ्यांची रिॲक्शन; पालकांमध्ये भीतीचे वातावरण; रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू

October 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

संतापजनक! ​रात्री सर्वांसोबत जेवण, सकाळी खोलीत आढळला मृतदेह; लग्नानंतर अवघ्या चौथ्या दिवशी नेमकं काय घडलं?

October 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! २७ ऑक्टोबरला शाळा-अंगणवाड्यांत मिळणार मोफत ‘या’ गोळ्या; जाणून घ्या संपूर्ण नियोजन

October 24, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढ्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला! राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, भाजपची ताकद पणाला; दुष्काळाच्या सावटात मतदानाचा टक्का कोणाचा गेम करणार?

October 23, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सक्तीने कर्जवसुली कराल तर खबरदार..! मायक्रो फायनान्स, खासगी सावकारांना जिल्हाधिकाऱ्यांचा थेट कारवाईचा इशारा; शेतकऱ्यांशी २४ तास संवाद : टँकर, चाऱ्यासह सर्वांची व्यवस्था होणार

October 20, 2026

जमिनीच्या तुकड्यासाठी नात्यांचा खून! सासर्‍याने सुनेच्या डोक्यात घातला कुऱ्हाडीचा दांडा; सासूने दिली थेट जिवे मारण्याची धमकी

October 21, 2026
Next Post
उपमुख्यमंत्री अजित पवारांना थकवा जाणवू लागल्याने केली कोरोना टेस्ट; रिपोर्ट आला

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केंद्राने दिली मोठी जबाबदारी

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

दिवाळीच्या तोंडावर मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची दुष्काळी मदत जमा; बँकांनी थकीत कर्जापोटी पैसे कपात केल्यास कारवाईचा इशारा

November 4, 2026
महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

November 3, 2026

निवृत्तीनंतर उघड झाली ३१ वर्षांची काळी माया! कृषी खात्यातील बड्या अधिकाऱ्याचा तो प्रताप अखेर चव्हाट्यावर…

November 3, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विसरली सुट्टी; मंगळवेढा तहसीलमध्ये रात्रंदिवस खटपट

November 2, 2026
सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

November 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा