टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा नगरपालिका प्रभाग क्रमांक ६ च्या निवडणुकीसंदर्भातील न्यायालयीन कारवाईत महत्वाची घडामोड झाली आहे. न्यायालयाने युक्तिवाद मान्य करत अपील फेटाळले असून मनीषा मेटकरी यांचा अर्ज कायम ठेवला आहे.

यानंतर प्रभाग ६ मधील निवडणूक आता नियमानुसार पार पडणार आहे. दरम्यान, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनंदा आवताडे आणि भाजप उमेदवार सुजाता जगताप यांच्या अपिलांवर काल मंगळवारी सुनावणी होणार होती.
दिवसभर संबंधित तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली असून, आज बुधवारी सुनावणी पूर्ण होऊन अपिलावर निर्णय लागण्याची शक्यता असल्याची माहिती अॅड. संतोष माने यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर या सुनावणीवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाली असून, यामध्ये अर्ज छाननीच्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काही कारणास्तव अवैध ठरवले आहेत तर आणि काही लोकांच्या हरकती दाखल झालेल्या अर्जापैकी सांगोल्याच्या सुचिता मस्के, शोभा घोंगडे, पंढरपूरचे सूर्यकांत कदम यांचे अर्ज न्यायालयात वैध ठरले आहेत. त्यामुळे ही मंडळी आता विविध नगरपरिषदेच्या निवडणूकीत रिंगणात राहणार आहेत.

तर दुसरीकडे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अनगरच्या उज्वला थिटे आणि मंगळवेढ्याच्या सुनंदा आवताडे तसेच मैंदर्गी नगरपरिषदेच्या नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केलेल्या परवीनबानो बांगी आणि मोहोळच्या अविनाश पांढरे यांच्या अर्जावरील सुनावणी न्यायालयात पूर्ण झाली.

सर्वाधिक चर्चा असलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र सूचकांची सही नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला होता. त्या निर्णयाविरोधात थिटे यांनी सोलापूर जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याची सुनावणी मंगळवारी घेण्यात आली.

यावेळी थिटे यांच्या वकीलांनी वेळ मागितल्याने बुधवारपर्यंत न्यायालयाने त्यांना वेळ दिली आहे. तर मोहोळ नगरपरिषदेच्या नगरसेवकपदासाठी अविनाश पांढरे यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या अर्जावर शिवरत्न गायकवाड यांनी हरकत घेतली होती त्याचीही सुनावणी पूर्ण झाली असून अर्ज फेटाळण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











