मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष 19 व नगरसेवक पदासाठी 179 दाखल उमेदवारी अर्जाची छाननी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली.

आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून छाननी सुरुवात झाली होती, यामध्ये प्रथम नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांना बोलवून एकत्रितरित्या छाननी करण्यात आली.

यावेळी दोन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध हरकती घेतल्या, या हरकतीचे सुनवाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दुपारी तीन वाजता ठेववी होती.

दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल 3 तास सुनावणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर घेण्यात आली. दोन्ही उमेदवारांनी सोलापूर येथील नामांकित वकिलांची फौज उभी केली होती.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोन्ही बाजूने युक्तिवाद ऐकून घेतला, यावर निर्णय अद्याप दिलेला नाही,

निर्णय देण्यासाठी विलंब होत असल्यामुळे शहरांमध्ये विविध चर्चेला उधाण आले असुन यावर अंतिम निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी कधी देणार? निर्णय काय असणार? याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, 10 प्रभागातील किती उमेदवारांचे अर्ज अपात्र झाले? किती उमेदवारांवर हरकती आल्या याबाबत ही माहिती मिळू शकली नाही.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










