टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यातील ज्या ग्रामपंचायत मध्ये बालविवाह होईल त्या ग्रामपंचायत मधील सरपंच व सदस्यांचे पद रद्द करण्याची मागणी शिफारसी द्वारे राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर याच्या उपस्थितीत आज नंदुरबार जिल्हा अधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील महिला आयोगाशी निगडित तक्रारींचे निराकरण जन सुनावणीच्या मध्यामातून सोडवण्यात आल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना रुपाली चकांकर म्हणाल्या, राज्य महिला आयोगाला सादर केलेल्या प्रत्येक तक्रारदारांना न्याय दिला जाईल असे आश्वासन दिलं.
मुबई पुणे सारख्या शहरी भागातच महिला आयोगाचे काम नसून राज्याच्या शेवटच्या टोकावरील आदिवासी वाड्या पाड्यावर राहणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी राज्य महिला आयोग आपल्या दारी असल्याचे रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्ह्यात महिलांशी निगडीत कुपोषणाचा विषय मोठा असल्याने त्याला बालविवाह विषय कारणीभूत असल्याचे सांगत यावर
तोडगा म्हणून यापुढे ज्या ग्रामपंचायत मध्ये बालविवाह होईल त्या ग्रामपंचायत मधील सरपंच व सदस्यांचे पद रद्द करण्याची मागणी शिफारसी द्वारे राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी दिली आहे.
बालविवाह रोखल्यास कुपोषणासारख्या गंभीर प्रश्न मार्गी लागणार तसेच महिलांशी निगडीत समस्या सुटण्यास मदत होईल त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी मदत होईल अशी भूमिका रूपालीताई चाकणकर यांनी मांडली आहे.
जिल्ह्यातील तृतीय पंथीयां साठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयांमध्ये स्वतंत्र वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याची मागणी यावेळी आयोगाच्या वतीने करण्यात आली.
महिला आयोगाच्या जनसुनावणीत महिला अत्याचाराशी निगडीत 45 पेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्या होत्या यावर पोलीस प्रशासन, विधी प्राधिकरण विभाग, महीला आयोग यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेण्यात आली.(स्रोत:नवराष्ट्र)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज