टीम मंगळवेढा टाईम्स ।
काल क्रांती दिनी झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ स्थापनेत १८ मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आले आहे. या १७ जणात समावेश असणाऱ्या प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्याकडे उस्मानाबादसह सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व अर्थात पालकमंत्री पद देण्याची शक्यता वर्तवण्यिात येत आहे.
आगामी काळात मंत्रिमंडळ वस्तिारात सोलापूर जिल्ह्यातील आमदारांचा मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर ना. सावंत यांच्याकडून सोलापूरची जबाबदारी दुसऱ्याला देण्यात येणार आहे.
मात्र उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद ना.सावंत यांच्याकडे कायम राहणार असल्याचेही सांगण्यात येते.
मंत्रिमंडळ स्थापनेत सोलापूर जिल्ह्यातून आ.विजयकुमार देशमुख, आ.सुभाष देशमुख, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाची चर्चा होती.
मात्र यात सोलापूर जिल्ह्याला स्थान मिळाले नाही. त्या कारणाने मूळ सोलापूर जजिल्ह्यातील रहिवासी असलेले व सध्या भूम-परंडा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधत्वि करणारे प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व तात्पुरत्या स्वरूपात दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यिात येत आहे.
स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन कोणाच्या हस्ते?
दरवर्षी पंरपरेनुसार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करतात. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव घरोघरी साजरा केला जात असतानाच आता १५ ऑगस्टला झेंडावंदन कोणाच्या हस्ते होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्वातंत्र्यदिनाला आता केवळ सहा दिवस शिल्लक आहेत. तरीपण, शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्री निवडलेले नाहीत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज