टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीचे पाणी इंदापूरला पळविल्याच्या वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनीही पालकमंत्री भरणे यांना सोलापूरचा नाद करू नका , असा इशारा दिला आहे.
पालकमंत्री भरणे यांनी पंढरपुरातील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उजनीतून पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याला मंजुरी दिल्याचे सांगितले होते. यानंतर वाद सुरू झाला.
त्यानंतर सोलापूर दौऱ्यावर आल्यावर खुलासा करताना पालकमंत्री भरणे यांनी यु-टर्न घेत मी एक थेंबही इंदापूरसाठी घेतले नाही असे झाल्यास राजकीय सन्यास घेईन, अशी भूमिका मांडली होती.
त्यानंतर इंदापुरातील कार्यकत्यांसमोर भरणे यांनीच केलेल्या भाषणाची एक क्लीप व्हायरल झाली. त्यात भरणे यांचाखराचेहरा लोकांसमोर आला अन सोलापूर जिल्ह्यातून इंदापूरला पाणी पळविण्याच्या प्रयत्नाला विरोध सुरू झाला आहे.
माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पालकमंत्री भरणे यांना सोलापुरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला. त्यानंतर गरुवारी काँग्रेसचे शहर अध्यक्ष वाले यांनी पत्रकार परिषद घेऊन उजनीच्या पाण्याविषयी भूमिका स्पष्ट केली.
भरणे यांनी सोलापूरच्या नादी लागू नये. त्यांनी उजनीने पाणी पळविण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही , इंदापूरला पाणी देण्याला आमचा कायम विरोध राहील.
भरणे पालकमंत्री झाल्यापासून मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना सापत्नभावाची वागणूक देत आहेत. सिव्हिलच्या भेटीत त्यांनी नगरसेवक बाबा मिस्त्री यांचा अवमान केला. त्यांची ही कृती निषेधात्मक आहे , असे वाले म्हणाले.
यावेळी नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले, अंबादास करगळे. मिस्त्री उपस्थित होते.
राष्ट्रवादीचा घरचा आहेर
सीना माढा उपसा सिंचन योजनेपेक्षा जादा पाणी इंदापूरला नेण्याच्या प्रयलाला आमचा विरोध असेल, अशी भूमिका राष्ट्रवादीचे झेडपी सदस्य भारत शिंदे यांनी जाहीर केली आहे.
सीना माढा उपसा सिंचन योजनेतून अंबाड, शिराळ, पिपळखुटे, भोसरे , कुई , बावी , अंजनगाव, तुळशी, परितेवाडी, परिते, घोटी , आहेरगाव , अकोले बुदूक या गावांना पाणी आवश्यक असताना काढून पाणी पळविणे अर्नेसर्गिक आहे.
आमदार बबनदादा शिंदे यांनी आंदोलन उभे करावे, असे शिंदे यांनी म्हटले, उजनी धरणाचे पाणी पुणे जिल्ह्यात नेण्याचा विषय सध्या चचिला जात आहे.
याप्रश्नी मी सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या पाठीशी आहे. सोलापूरच्या हक्काचे पाणी इतरत्र कोठेही जाऊ दिले जाणार नाही. – प्रणिती शिंदे., आमदार, सोलापूर मध्य मतदारसंघ
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज