टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील दामाजीनगर ग्रामपंचायत प्रभाग 2 च्या श्री.संत दामाजीनगर ग्रामपंचायत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार सौ.आशा सिध्देश्वर डोंगरे यांना जनतेमधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
आशा डोंगरे या प्रत्येक घरात जाऊन तेथील नागरिकांच्या व महिलांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत. निवडून आल्यानंतर या अडचणी कशा पद्धतीने सोडविल्या जाणार आहेत याची माहिती सर्व मतदारांना देत आहेत.
आपल्या परिसराचा विकास झाला पाहिजे आपला परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी त्या विकासाचा ध्यास घेऊन ही निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी त्यांना परीसरातील जनतेतून वाढता प्रतिसाद मिळत आहे.
एक उच्छशिक्षित महिला आपला परिसर स्वच्छ व सुंदर करता यावा यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
या भागात गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांना निवडून दिले त्यांनी कोणतेही ठोस असे काम केले नाही. त्यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत.
आपल्या मूलभूत सुविधा पासून ते वंचित आहेत त्यामुळे यावेळी उच्छशिक्षित उमेदवाराला संधी देण्यासाठी नागरिकांनी चंग बांधला आहे.
या मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला असल्यामुळे आपला विजय निच्छित असल्याचा दावा आशा डोंगरे यांनी केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज