मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
श्री संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंगळवेढ्यात आज रविवार दि.७ ते १० मेदरम्यान ग्रंथदिंडी, वीणापूजन, राज्यस्तरीय भजन स्पर्धा प्रवचन होईल. संत चोखामेळा समाधी ट्रस्ट व वारी परिवाराच्या वतीने सोहळ्याचे आयोजन केले आहे.
श्री संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आज रविवारी सकाळी दहा वाजता श्री संत दामाजीपंत मंदिरापासून संत चोखामेळा समाधीपर्यंत ग्रंथदिंडी, पालखी प्रदक्षिणा होईल.
नामदेवरायांचे सोळावे वंशज माधव महाराज रामदास यांच्या हस्ते वीणापूजन होऊन. सकाळी ११ ते सायंकाळी ५ यादरम्यान राज्यस्तरीय भजन स्पर्धा होणार आहेत.
तर सायंकाळी सात वाजता विद्या प्रतिष्ठान बारामती येथील प्रा.राज कदम यांचे प्रवचन आयोजित केले आहे. सोमवारी दि.८ मे रोजी सकाळी ९ ते ५ भजन स्पर्धा होतील. सायंकाळी सात वाजता जेजुरीतील मनोज मोरे महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
मंगळवारी दि.९ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी चारपर्यंत महादेव यादव महाराज, अरुण शिवशरण यांचे भजन होईल. त्यानंतर दुपारी २ ते ४ या वेळेत मंगळवेढा तालुक्यातील मंडळांचा व भजन स्पर्धेतील विजेत्या मंडळांचे एकत्रित भजन होणार आहे.
सायंकाळी पाच वाजता भजन स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. सायंकाळी सात वाजता सुधाकर इंगळे महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
बुधवारी (दि. १०) सकाळी नऊ वाजता संत चोखामेळा समाधीस महाअभिषेक करण्यात येणार आहे.
दुपारी १२ वाजता संत शिरोमणी नामदेवराय महाराज यांचे सोळावे वंशज निवृत्ती महाराज रामदास पंढरपूर यांचे कीर्तन व समाधीस पुष्पवृष्टी होणार आहे. ट्रस्ट व वारी परिवार परिश्रम घेत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज