टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढ्यातील शिर्के मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये शिक्षक दिनानिमित्ताने दि.5 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 4 पर्यंत भव्य मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग व थायरॉईड शिबीर तपासणीचे आयोजन केले असल्याची माहिती डॉ.शरद शिर्के यांनी दिली आहे.
दरम्यान, मंगळवेढा तालुका माजी सैनिक संघटना मंगळवेढा तालुक्यातील आजी-माजी सैनिक व कुटुंबासाठी रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह तपासणी व मार्गदर्शन शिबिर सोबत वीर माता व वीर पत्नी यांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.
डॉ.अमोल चव्हाण एमबीबीएस, डीएनबी मेडिसिन (मुंबई) लिलावात हॉस्पिटल येथे केले असून त्यांनी 6 महिने ग्रामीण भागात आय.सी.यु कामाचा अनुभव आहे.
तसेच दमा व जुनाट खोकला या आजारावर देखील खात्रीशीर उपचार केले जाणार आहेत.
अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर, डीएनबी इंटरनल मेडिसिन लीलावती हॉस्पिटल मुंबई, सिनीर रेसीडंड लीलावती हॉस्पिटल मुंबई येथे सेवा त्यांनी दिलेली आहे.
सोमवार दि.5 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भव्य मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग व थायरॉईड तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा असे आव्हान शिर्के मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल तर्फे करण्यात आले आहे.
दि.5 सप्टेंबर पासून डॉ.अमोल चव्हाण हे दररोज 24 तास मंगळवेढा शहरासाठी उपलब्ध असणार आहेत.
डॉ.अभिजित साळुंखे हे शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा सेंटर (अक्सिडंट) , फ्रॅक्चर आदींवर उपचार करणार आहेत. सकाळी 10 ते 3 व सायंकाळी 6 ते 8 यावेळेस ते दररोज उपलब्ध असणार आहेत.
नाव नोंदणीसाठी ‘येथे करा संपर्क
नागरिकांनी शिबिरामध्ये येण्याअगोदर 9021578180 या नंबर वर आपले नाव नोंदवावे
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज