mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पोरांनो! शाळांना लागोपाठ पाच दिवसांची सुट्टी; शिक्षकांना ३ दिवसांची विशेष रजा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 14, 2023
in शैक्षणिक
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी अधिवेशनासाठी राज्य शासनाने १५ ते १७ फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा शिक्षकांना मंजूर केली आहे,

राज्यातील शिक्षकांना यामुळे शनिवार व रविवारच्या सुट्टीला जोडून एकत्रित पाच दिवसांची सुट्टी मिळणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली आहे

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वार्षिक अधिवेशन व शिक्षण परिषद रत्नागिरी येथील चंपक मैदानावर १७ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्ष नेते अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक जण उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्यातील सर्वात मोठी शिक्षक संघटना आहे. संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेचे राज्यभरात दोन लाखाहून अधिक सभासद आहेत.

शिक्षक संघाच्या राज्य अधिवेशनावेळी बहुसंख्य शिक्षक उपस्थित राहणार असल्याने राज्यातील शाळा यावेळी बंद राहणार आहेत.

राज्य शासनाने या अधिवेशनास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांसाठी १५ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा मंजूर केली आहे. १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री व १९ फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने सलग पाच दिवसांची सुट्टी राज्यातील शिक्षकांना मिळणार आहे.

जुनी पेन्शन योजना, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी, समाजशास्त्र शिक्षकांना संरक्षण, जुन्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदलीमध्ये वाढीव संधी, विनाअट घरभाडेभत्ता, महापालिका वाढीव हद्दीतील शाळांचे शिक्षकांसह वर्गीकरण, एम एस सी आय टी मुदतवाढ,

शिक्षण सेवक भरती, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नती यांसह अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर या अधिवेशनात चर्चा होणार असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.

शिक्षक संघाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत, शिक्षकांच्या विशेष रजेसाठी शालेय शिक्षण, ग्रामविकास व नगरविकास विभागास खुद्द मुख्यमंत्री कार्यालयातून निर्देश दिले गेले आहेत .यामुळे प्रत्यक्ष अधिवेशनात शिक्षकांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या घोषणा करतात याकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्ह्यातून रत्नागिरी येथील अधिवेशनासाठी १० हजार हून अधिक सभासदांनी नोंदणी केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.(स्रोत:लोकमत)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शाळांनासुट्टी

संबंधित बातम्या

पालकांनो, खिशाला कात्री लागणार नाही! सरकारने ‘या’ विद्यार्थ्यांची परीक्षा फी केली माफ; पहा तुम्ही पात्र आहात का?” जाणून घ्या…

February 13, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

टेन्शन मुक्त! दहावी आणि बारावीच्या मुलांना परीक्षेचे टेन्शन; एका कॉलवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घेता येणार; बोर्डाने केली तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती

February 9, 2026
कडेपठार चंपाषष्ठी अन्नदान सेवा ट्रस्ट, जुनागड-जेजुरी यांच्या वतीने मुक्ताई मतिमंद मुलांच्या बालगृहास सामाजिक संस्थेचा मायेचा आधार

कडेपठार चंपाषष्ठी अन्नदान सेवा ट्रस्ट, जुनागड-जेजुरी यांच्या वतीने मुक्ताई मतिमंद मुलांच्या बालगृहास सामाजिक संस्थेचा मायेचा आधार

January 27, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा; एका कॉलवर प्रश्न सुटणार

January 26, 2026
कौतुकास्पद! जयराम आलदर यांना सोलापूर मुख्याध्यापक संघाने दिली मोठी जबाबदारी; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

कौतुकास्पद! जयराम आलदर यांना सोलापूर मुख्याध्यापक संघाने दिली मोठी जबाबदारी; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

January 20, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

अभिनव उपक्रम! मोबाईल गेम्स, टी.व्ही. मालिकांच्या प्रभाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावात अभ्यासाचा भोंगा सुरू; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहाटे वाजतो भोंगा

January 13, 2026
सिनेअभिनेत्री शिवाली परब आणि सिनेअभिनेते संदीप पाठक आज थेट ‘भालेवाडी’करांच्या भेटीला; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मिळणार बळ

सिनेअभिनेत्री शिवाली परब आणि सिनेअभिनेते संदीप पाठक आज थेट ‘भालेवाडी’करांच्या भेटीला; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मिळणार बळ

January 8, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

कामाची बातमी! एकदा आरक्षणाचा फायदा घेतला तर खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

January 16, 2026
Next Post
संतापजनक! मंगळवेढ्यात जन्मदात्या आईनेच केला मुलीचा खून

संतापजनक! मंगळवेढ्यात विवाहितेचा विनयभंग केल्या प्रकरणी एका विरुध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

बापरे..! जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी इच्छुक झाले कर्जबाजारी; सावकाराचे कर्ज डोक्यावर : निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च

February 13, 2026

पालकांनो, खिशाला कात्री लागणार नाही! सरकारने ‘या’ विद्यार्थ्यांची परीक्षा फी केली माफ; पहा तुम्ही पात्र आहात का?” जाणून घ्या…

February 13, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुपाऱ्या दिल्या जातायत; मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप, म्हणाले….

February 13, 2026
लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा