मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं 31 हजार 628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेज संदर्भातील जीआर सरकारने काल जाहीर केला होता. यामध्ये राज्यातील 29 जिल्ह्यातील 253 तालुक्यांचे नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
यामध्ये काही जिल्हे वगळले होते. मात्र, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यांतर सरकारनं आज पुन्हा नवीन जीआर काढला आहे. यामध्ये सरकारनं राज्यातील 34 जिल्ह्यातील 347 तालुक्यांचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे.
तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आणि 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांची फी माफी करण्याचा निर्णय सरकारनं या नवीन जीआरमध्ये घेतला आहे.
एकूण 65 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान
राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 347 तालुक्यातील शेती पिकांचे, शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जनावरे दगावणे, मनुष्य हानी होणे, घराची पडझड होणे यासाठी सरकारनं मदतीचा नवीन जीआर जाहीर केला आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या जीआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार,
जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात राज्यातीस 26.69 लाख हेक्टर क्षेत्र आणि सप्टेंबरमध्ये 39 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. म्हणजे एकूण 65 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे.
नवीन जीआरनुसार नेमक्या काय मिळणार सवलती?
1) जमिन महसुलात सूट
2) सहकारी कर्जाचे पुनर्गठन
3) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीसाठी स्थगिती (एक वर्षासाठी)
4) तिमाही वीज बिलात माफ
5)परीक्षा शुल्कात माफी व 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांची फी माफी
काय आहेत शासकीय मदतीचे निकष?
आपातग्रस्त मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख अर्थसाहाय्य मिळेल. ६० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास 2.50 लाख आणि जखमी व्यक्ती रुग्णालयात दाखल असल्यास 5,400 ते Rs 16,000 पर्यंत मदत मिळणार आहे.
पूर्णतः नष्ट झालेल्या घरांसाठी (पक्क्या/कच्च्या) सपाट भागात 1.20 लाख, तर डोंगराळ भागात 1.30 लाख आणि अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी 6,500 (पक्के) ते 4,000 (कच्चे) पर्यंत मदत दिली जाईल. झोपडीसाठी 8,000 आणि गोठ्यासाठी Rs 3,000 ची मदत मिळणार आहे.
किती मिळणार नुकसान भरपाई
जिरायत पिकांसाठी 8,500 प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी 17,000 प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 प्रति हेक्टर (जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मर्यादेत) मदत मिळेल.
नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढण्यासाठी 18,000 प्रति हेक्टर, तर जमीन खरडून गेली असल्यास (केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना) 47,000 प्रति हेक्टर मदत जाहीर करण्यात आली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज