टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आज उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी प्रांत अधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार बाळासाहेब मोरे यांनी निवेदन स्वीकारले.
मंगळवेढा तालुक्यातील सर्व मंडलमध्ये गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून अविरत अतिवृष्टी होत आहे. या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः सूर्यफूल, मका, कांदा, बाजरी, उडीद, तूर व इतर पिके तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
1.मंगळवेढा तालुक्यातील सर्वच मंडलामध्ये ओला दुष्काळ घोषित करावा.
2.अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना कोणतेही जाचक निकष न लावता सरसकट व विनाअट नुकसान भरपाई द्यावी.
3.शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी लागणारी बियाणे, खते, औषधे यासाठी विशेष आर्थिक मदत व सवलतीच्या योजना राबवाव्यात.
4.बागायत पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन अतिरिक्त नुकसान भरपाई पॅकेज देण्यात यावे.
5.शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासन स्तरावर विलंब न लावता मंजूर करण्यात यावेत. यावेळी बोलताना अनिल सावंत म्हणाले या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेली पिके पाण्याखाली जाऊन नष्ट झाली असून शेतकरी वर्ग पूर्णतः हवालदिल झाला आहे.
याव्यतिरिक्त शेतांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी साठले असल्याने रब्बी हंगामातील पेरणी व उत्पादनावरही परिणाम होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक अडचण अधिकच गंभीर होऊन त्यांचा उदरनिर्वाह व जीवनमान धोक्यात आले आहे.
सदर परिस्थिती ही एक नैसर्गिक आपत्ती असून यावर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले आहे. शेतकरी वर्ग आजमितीस शासनाकडून मदतीची अपेक्षा बाळगून आहे. शासनाने तात्काळ ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करणे ही काळाची गरज आहे.
शेतकरी वर्ग ही राष्ट्राची अन्नदाते असून त्यांचे अस्तित्व टिकणे हेच समाज व अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून तातडीने बाहेर काढणे व त्यांच्या जगण्याला आधार देणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे.
शासनाने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रांतिक सदस्य राहुल शहा, राष्ट्रवादी नेते अनिल सावंत, चंद्रशेखर कोंडूभैरी, मारुती आकडे, सुभाष कदम, आबासाहेब माळी, राजाभाऊ चेळेकर, महादेव जिरगे, दादासाहेब पवार, संतोष रंधवे, माणिक गुंगे, सुरेश कट्टे,
साहेबराव पवार, बबन ढावरे, जमीर इनामदार, संगीता कट्टे, स्मिता अवघडे, मंदाकिनी सावजी, प्रियदर्शनी नागणे, सुखदेव डोरले, भाळवणीचे सिताराम भगरे, सागर गुरव, रावसाहेब बनसोडे, संजय मस्के, राहुल चौगुले, संभाजी भोसले, पंडित गवळी, वैभव ठेंगील आधी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज