mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मुलीच्या लग्नासाठी सोलापुरच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नामी शक्कल! ६ लाख ५० हजार रुपयांची केली शासनाची फसवणूक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 28, 2021
in सोलापूर, क्राईम
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने त्याच्या मुलीच्या विवाहासाठी भविष्य निधीतील पैसे काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेशाची बनावट कागदपत्रे तयार केली. ६ लाख ५० हजार रुपयांची शासनाची फसवणूक केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

ही घटना २६ एप्रिल २१ रोजी घडली. चौकशीनंतर ही बाब उघडकीस आल्याने याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नाना सोनवणे (सोलापूर) यांनी बार्शी शहर पोलिसांत डॉ. तानाजी शिवाजी खांडेकर, सहा. आयुक्त तालुका लघुवैद्यकीय चिकित्सालय (बार्शी) यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली. पोलिसांनी भादंवि ४२०,४६५ अन्वये गुन्हा नोंदला आहे.

पोलीस सूत्रांनुसार प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त पुणे कार्यालयाच्या लक्षात येताच ही बाब येताच त्यांनी उपकोषागार अधिकाऱ्यांना सूचित करून देयक रोखण्याची कार्यवाही करावी, असे मेलद्वारे तत्काळ प्रक्रिया करून २७ एप्रिल २०२१ रोजी देयक ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशी करताना डॉ. तानाजी खांडेकर यांनी लेखी जबाबात सांगितले की, मुलीच्या विवाहासाठी पैशाचीं गरज असल्याने १८ मार्च २०२१ रोजी प्रस्ताव सादर केल्यानंतर पुन्हा एकदा सादर केला होता. पाठपुरावा केल्यानंतर आदेश प्राप्त झाला होता परंतु तो चुकीचा असल्याने पुन्हा १६ एप्रिल रोजी प्रस्ताव सादर केला.

पण कोविडच्या कारणाने प्रस्ताव पुणे येथे घेऊन जाणे शक्‍य नसल्याने वरिष्ठ कार्यालयाचे बनावट मंजुरी आदेशाचे पत्र २२ एप्रिल २०२१ रोजीचा जावक क्रमांक, सही करून २६ एप्रिल २०२१ रोजी मंजुरीसाठी उपकोषागार अधिकारी, बार्शी येथे सादर केले होते.

या प्रकरणी संपूर्ण चौकशीअंती प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, पुणे यांना अहवाल देण्यात आला. खांडेकर यांनी बनावट खोटे दस्तऐवज तयार करून भविष्य निर्वाह निधी देयक कोषागारातून पारित केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.

त्यामुळे शासनाची दिशाभूल, बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, असे आदेश आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी दिले, असल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे. तपास फौजदार कर्णेवाड करत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर

संबंधित बातम्या

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

October 1, 2026
Next Post
टेन्शन वाढले! मंगळवेढ्यातील ‘हा’ भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित; पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार

सोलापूर ब्रेकिंग! जिल्ह्यातील 'ही' गावे कोरोनाचा हॉट स्पॉट; आता सरपंच व ग्रामसेवकांवर जबाबदारी

ताज्या बातम्या

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा