मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
महिला सबलीकरणासाठी केवळ महिलांनीच नव्हे तर सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. सांगली जिल्ह्यामध्ये महिला सबलीकरणासाठी आम्ही नवीन प्रयोग केला.
यातून 50 शाळांमधील 36 हजार मुलींना दर आठवडा एक तास शनिवारी कराटे आणि ज्युडो प्रशिक्षण आम्ही दिले. त्यातील पहिला येलो बेल्ट 15 हजार 400 मुलींना आम्ही काल दिला आहे. त्याच्या पुढचे बेल्ट मिळवण्यासाठी जे जे शुल्क द्यावे लागते ते प्रशासन देणार आहे.

त्याचबरोबर जून महिन्यापासून प्रत्येक शाळेत स्वसंरक्षणासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण देणार येणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. ते रविवारी सांगलीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या 5 लाख मुलींना कॉलेज फी नाही, होस्टेल फी नाही. या व्यतिरिक्त दर महिना दोन हजार रुपये कमवा आणि शिका योजनेतून देणार असल्याची घोषणा उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

सांगलीतील मुली व महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत कराटे प्रशिक्षण झालेल्या मुलींना येलो बेल्ट आणि प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह अधिकारी, कराटे प्रशिक्षण घेतलेल्या मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

मुलींचं कराटे प्रशिक्षण पाहून माझं म्हातारपण सुखरुप जाईल असा विश्वास वाटतो: खासदार विशाल पाटील
महिला दिनानिमित्तच्या कार्यक्रमात कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत मुलीचे मोफत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण पाहून मला माझ्या मुलींची आठवण झाली. मला ही दोन मुली आहेत. हे मुलींचे कराटे प्रशिक्षण पाहून माझे म्हातारपण सुखरूप जाईल, असे खासदार विशाल पाटील यांनी वक्तव्य करताच कार्यक्रमात हशा पिकला.

सांगलीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत मोफत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी कराटे प्रशिक्षण घेतलेल्या जवळपास 1 हजार मुलींना यलो बेल्ट ग्रेड प्रमाणपत्रचे वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात खासदार विशाल पाटील बोलत होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















