टीम मंगळवेढा टाईम्स।
पंढरपूर शहरातील एक मुलगी पोलीस भरतीची तयारी करत असताना आरोपी नामे रमेश सुरेश भोसले (भिसे) वय 22 वर्ष रा.यलम्मा मंदिरा जवळ ,आंबे गाव ता.पंढरपूर जि.सोलापूर याने
तिला आपण पोलीस उपनिरीक्षक आहोत तसेच आपले वडील आयपीएस अधिकारी आहेत असे खोटे सांगून व तुला पोलीस भरतीसाठी मदत करतो असे अमिष दाखवून
त्या मुलीशी व तिच्या घरातील लोकांशी संपर्क वाढवला व वारंवार वेगवेगळया अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून मुलीला व तिच्या घरच्यांना लग्नासाठी तयार केले.
त्यासाठी तो गेली सहा महीन्यापासुन पीडीत मुलगी व त्याचे घरच्याच्या संपर्कात होता.
आरोपी रमेश सुरेश भोसले याने आपण खरोखरच पोलीस उपनिरीक्षक आहोत भासविण्याठी पोलीस उपनिरीक्षक या पदाचा खाकी रंगाचा गणवेश, बेल्ट, कॅप, खेळण्यातील पिस्तोल इ. साहित्य
सोलापूर येथून आणून पोलीस अधिकारी असल्याचे बनावट पोलीस ओळखपत्र व बनावट आधारकार्ड देखील तयार करुन घेवून त्याचा उपयोग त्याने मुलीची व तिचे घरातील लोकांची फसवणुक करणेसाठी केला
व आपण मंगळवेढा पोलीस ठाणे येथे पीएसआय म्हणून कार्यरत असल्याचे सांगून सदर मुलगी व तिच्या घरच्यांचा विश्वास संपादन करून तिच्याषी विवाह करण्यासाठी वारंवार तगादा लावला होता.
परंतु सदर मुलीला आरोपीच्या वागण्याचा संशय आल्याने मुलीने मंगळवेढा पोलीस ठाणे व पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे खात्री केली असता रमेश सुरेश भोसले
या नावाचे कोणीही अधिकारी या दोन्ही पोलीस ठाणेत अधिकारी म्हणून कार्यरत नसल्याची माहिती प्राप्त झाल्याने व आपली फसवणूक होत असल्याचे या मुलीचे लक्षात आल्यावर
या मुलीने निर्भया पथक पंढरपूर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार सांगीतलेवर निर्भया पथकाच्या पोलीसांनी खात्री करणेसाठी त्या मुलीस
आरोपी रमेश सुरेश भोसले (भिसे) यास बोलावून घेवून त्याचे सोबत बोलण्याच्या सुचना दिल्या त्याप्रमाणे मुलीने आरोपीस बोलावून घेवून त्याचे सोबत बोलणे चालू ठेवले असताना
निर्भया पथकातील पोलीसांनी आरोपी रमेश सुरेश भोसले (भिसे) यास ताबेत घेवून खात्री केली तेंव्हा त्याचेकडे आसलेल्या सॅक मध्ये खाकी रंगाचा पोलीसांचा गणवेश, बेल्ट, कॅप, खेळण्यातील पिस्तोल,
बनावट पोलीस ओळखपत्र, आधारकार्ड मिळून आल्याने त्याबाबत त्यांचेकडे या मिळून आलेल्या गणवेशाबाबत व साहित्या बाबत
कोणतेही समाधानकारक उत्तर देवू शकला नाही व त्याने गुन्हयाचे कबुली दिल्याने पोलीसांनी त्यास पुढील कायदेशीर कारवाई करणेसाठी ताबेत घेतले आहे.
या झालेल्या फसवणुकी बाबत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पंढरपूर षहर पोलीस ठाणेस गु.र.नं.160/2022 भादविसंक 420,354 (ड),170,171 नुसार गुन्हा दाखल केला असून
पोलीसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक, प्रशांत भागवत हे करीत आहेत. न्यायालयाने या आरोपीस 5 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावणली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज