टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) अखेर गट ब आणि गट ब सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. गट कच्या 1333 आणि गट बच्या 482 जागा भरल्या जाणार आहेत.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहिरात प्रसिद्ध केल्यानं स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र लोकसभा आयोगानं त्यांच्या वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर अर्ज दाखल करावे लागणार आहेत.
गट क सेवेतून कोणत्या जागा भरल्या जाणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काल त्यांच्या वेबसाईटवर महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेद्वारे 1333 जागा भरल्या जाणार आहेत.
यामध्ये उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक ,बेलिफ लिपीक, गट क नगरपाल मुंबई, लिपिक टंकलेखक या जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
कोणत्या पदांसाठी किती जागा?
उद्योग निरीक्षक 39 जागा, कर सहायक 482 जागा, तांत्रिक सहायक 09 जागा, बेलिफ लिपीक, गट क नगरपाल मुंबई 17 जागा, लिपिक टंकलेखकच्या 786 जागा भरल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यासाठी राज्यातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. गट कची परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्याचीसाठी 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरचा वेळ देण्यात आला आहे.
महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र गट क सेवा भरतीसह गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. याद्वारे गट ब मधील सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक पदं भरली जाणार आहेत.
सहायक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित 54 जागा, राज्य कर निरीक्षक गट ब अराजपत्रित 209 जागा आणि पोलीस उपनिरीक्षक 216 जागा भरल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा परीक्षा 5 जानेवारीला आयोजित करण्यात येणार आहे. गट ब मधील पदांसाठी अर्ज करायचा असल्यास 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान अर्ज दाखल करता येतील.
परीक्षा शुल्क किती ?
महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 394 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 294 रुपये फी भरावी लागेल. महाराष्ट्र गट ब सेवा अराजपत्रित मधील पदांसाठी परीक्षा शुल्क देखील सारखंच असेल. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज