टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील (ता. मंगळवेढा) झारेवाडीमध्ये हॉटेलसाठी लागणारी शेव घरी तयार करताना गॅसचा स्फोट होऊन दोन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाला. तर आई-वडील, एक बहिण आणि चुलती गंभीर भाजले. बुधवारी दुपारी २:३० च्या सुमारास ही घटना घडली.
दोन वर्षाची चिमुरडी श्रेया दादासो गंगथडे आणि ३ वर्षाची स्वरा यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचे आई-वडील मोनाली दादासो गंगथडे (वय ३८), दादासो विष्णू गंगथडे (वय ४५), एक मोठी बहिण (अनुजा वय ५) आणि चुलती सुनिता राहुल गंगथडे (वय ३३ रा) गंभीररित्या भाजले.
नंदेश्वर गावापासून दोन किलोमीटरवर असणाऱ्या झारेवाडी येथील दादासो विष्णू गंगथडे यांचे शिरशी येथे हॉटेल आहे. दादासो आजारी असल्यामुळे दोन ते तीन दिवसापासून हॉटेल बंद होते.
हॉटेल उघडण्यासाठी तयारी म्हणून गॅसवर चिवडा केला. शेव करताना अचानक गॅसचा पाईप लिक होऊन स्फोट झाला. त्यामध्ये चिमुरडी श्रेया व स्वरा गंभीररित्या भाजल्याने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. मोठी बहिण, आई, वडील, चुलती हे गंभीरित्या जखमी झाले. त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.
रात्री उशिरा सोलापूर ग्रामीणची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. स्फोट नेमका कशामुळे झाला याचा उलगडा फॉरेन्सिकचा अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज