टीम मंगळवेढा टाईम्स ।
व्यवसायासाठी बँकेचे २५ लाखाचे कर्ज प्रकरण मंजूर करून देतो म्हणून एकाने वरिष्ठ अधिकाऱ्याला २ लाख कमिशन द्यावे लागेल असे सांगून तरूणाकडून सुमारे १ लाख ४४ हजार रुपये घेतले आणि कर्ज प्रकरण मंजूरन करता त्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी राहुल सुभाष घाडगे (रा.महादेव गल्ली, सांगोला) याने शिवराज महारुद्र स्वामी (रा.लक्ष्मीदहिवडी, ता. मंगळवेढा) याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सांगोला येथील राहुल घाडगे याच्या मित्राने लक्ष्मीदहिवडी येथील शिवराज महारुद्र स्वामी हे प्रोजेक्ट लोन करून देतात , अशी ओळख करून दिली.
२०१९ मध्ये घाडगे याने शिवराज स्वामी यांची भेट घेऊन कर्जप्रकरण करून देता का, असे विचारले. त्यावेळी त्याने मी २५ लाखाचे प्रोजेक्ट लोन करून देतो, त्यापोटी वरिष्ठ अधिकाऱ्यांना २ लाख रुपये कमिशन द्यावे लागेल , असे म्हणाला होता.
त्यावर राहुल घाडगे याने मी तुम्हाला थोडे थोडे करून कमिशनचे पैसे देतो, माझे लोन मंजूर करून द्या, अशी विनंती केली. त्याने मिञ ॠत्विक खडतरे याच्या गुगल-पे ॲपवरून व स्वत: टप्प्याटप्प्याने सुमारे १ लाख ४४ हजार रुपये शिवराज स्वामी यांच्या लक्ष्मीदहिवडी येथील बँक ऑफ इंडिया शाखेतील खात्यावर जमा केले.
त्यानंतर कर्जप्रकरणाची फाईल मंजूर होण्यास तीन महिने लागतील, असे सांगून लवकरच कर्ज मंजूर करून घेतो, असे सांगितले.
राहुल घाडगे याने वेळोवेळी लोनसंदर्भात विचारले असता काहीतरी कारण सांगून थोड्या दिवसांत फाईल मंजूर होईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, लोन मंजूर होण्याबाबत शंका येऊ लागल्याने त्याने माझे लोन मंजूर करायचे राहू द्या, माझे घेतलेले पैसे परत द्या, असे म्हणाला. यावेळी आज देतो, उद्या देतो म्हणून प्रोजेक्ट लोन मंजूर न करता सुमारे १ लाख ४४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
याबाबत राहुल घाडगे याने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी शिवराज स्वामी याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.(स्रोत:लोकमत)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज