टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील ग्रामदैवत संत गैबीपीर ऊरूस कमिटीच्या सरपंचपदी प्रशांत गायकवाड यांची निवड करण्यात आली आली.
ऊरूस कमिटीची बैठक गुरुवारी रात्रौ ८.०० वा. गैबीपीर दर्गाह येथे विष्णूपंत आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत प्रशांत गायकवाड यांची निवड जाहिर करण्यात आली.
काय सांगताय! मंगळवेढ्यात स्वराज कॅफेमध्ये शिवजयंती निमित्ताने आज मोफत ‘सेंद्रिय गुळाच्या चहा’चे वाटप
सदर प्रसंगी उपसरपंचपदी आण्णा ओमने तर कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन अध्यक्ष गायकवाड व उपाध्यक्ष ओमने यांचा विष्णूपंत आवताडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सुरुवातीस मावळते अध्यक्ष युवराज शिंदे यांनी मागील वर्षाचा जमा खर्च सादर केला. व ५१ हजार ९३२ रुपये शिल्लक असल्याचा हिशोब बैठकीत मांडला. त्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.
यावेळी ज्ञानेश्वर भगरे, नुरोद्दीन मुजावर,सोमनाथ आवताडे,मुरलीधर सरकळे,विष्णूपंत जगताप,बबलू सुतार,गौस मुजावर, महिबुब मुजावर, फारूक मुजावर , ॲड.गुरुराज बुरकूल, समाधान हेंबाडे, पृथ्वीराज घुले,परमेश्वर पाटील , सचिन डोरले , मुन्ना मुजावर , नजीर इनामदार , प्रविण भोसले, राजाभाऊ शिंदे, सलीम खतीब,
बाळू नागणे, मुझम्मील काझी, पप्पू कोताळे , किसन गायकवाड , चंद्रकांत काकडे , अल्ली शेख , जमीर इनामदार , शरीफ सय्यद , पीर मुजावर , जावेद मुजावर , अबू रजेबल्ली , रजाक मुजावर , रियाज मुजावर , हैदर मुजावर , मोहसीन मुजावर ,
इलियाज मुजावर , अशपाक मुजावर , अझजर मुजावर , दिलावर मुजावर , ज्ञानेश्वा सातपुते , इरफान मुजावर , सत्तार मुजावर , शब्बीर शेख, पिनू आवताडे , अमीर मुजावर , विकास भगरे, महेश जाधव, गजानन जाधव , बबलू काझी, रविराज बुरकूल , प्रशांत गजेंद्रगडकर उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज