मंगळवेढा टाईम्स टीम ।
वाळूच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी व साहेबांना हप्ता देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळलेला फरार पोलिस नाईक संतोष चव्हाण शरण आल्याने लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली असून आज न्यायालयात उभे करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस निरिक्षक कविता मुसळे यांनी दिली.
बोराळे येथील एका इसमाचा वाळूचा ट्रॅक्टर बोराळे बीटमध्ये कार्यरत असलेले पोलिस नाईक संतोष चव्हाण यांनी पकडून पोलिस जामीन स्टेशन आवारात आणून लावला होता . होता ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी व निरिक्षक साहेबांना हप्ता देण्यासाठी ३० हजार पाठविली रुपये लाचेची मागणी केली होती.
तदनंतर ट्रॅक्टर मालकाने याची तक्रार पुणे येथील लाच लुचपत विभागाकडे होवूनही केल्यानंतर दि.१३ मे रोजी फोनवरून पोलिस नाईक चव्हाण व तक्रारदार यांच्यामधील संभाषणाची पडताळणी करून चव्हाण याच्याविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबतचा संशय येताच चव्हाण याने रजा टाकून पलायन केले होते.आरोपी चव्हाण याने अटकपूर्व जामीनसाठी पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.बी.लंबे यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
या अर्जावर सरकारी वकिल सारंग वांगीकर यांनी ३० हजार रुपयामधील हप्ता कोणत्या साहेबास दयावयाचा आहे त्यांचे नाव निष्पन्न करणे , ते चव्हाणच सांगू शकतात तसेच त्यांच्या संभाषणातील आवाजाचा नमुना घ्यावयाचा असल्याचे मुद्दे न्यायालयापुढे मांडल्यानंतर अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यात आला होता.
आरोपीच्या शोधासाठी पोलिस निरिक्षक मुसळे यांनी पथकेही पाठविली होती. मात्र ते फरार असल्यामुळे मिळून आले नाहीत. दरम्यान अटकपूर्व जामीन नामंजुर होवूनही आरोपी फरार होता. अखेर सोमवारी ते स्वतःहून लाच लुचपत विभागाकडे हजर झाले असून आज त्यांना न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज