टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील चोखामेळा चौक बाजारपेठेतील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत
आज सोमवार दि.30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 पासून मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर प्रवीण सारडा यांनी दिली आहे.
11 वर्ष प्रदीर्घ अनुभव व 2 हजार 500 हुन अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केलेले गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये आज मोफत शस्त्रक्रिया शिबीर संपन्न होणार आहे.
तज्ञ डॉक्टरांची टीम यामध्ये तपासणी, शस्त्रक्रिया मोफत करून औषधे देखील मोफत दिली जाणार आहेत.
यामध्ये डॉ.प्रवीण सारडा (स्पाईन सर्जरी फेलो जर्मनी, ट्रामा केअर, डीएनबी आर्थो स्पेशलायझेशन, डॉ.निकिता सारडा, (डेंटल सर्जन, रुट कॅनल स्पेशालिस्ट व दंत सौदर्य उपचार तज्ञ),
डॉ.महेश कोडलकर (पोटाचे विकार तज्ञ लेप्रोस्कोपी व इंडॉस्कॉपी तज्ञ) व डॉ.निखिल कोडलकर ( जनरल फिजिशन) या तज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून वरील उपचार मोफत तपासणी शस्त्रक्रिया औषध दिले जाणार आहेत.
गजानन लोकसेवा हॉस्पिटलमधील अद्यावत सेवा
• फॅक्चरचे सर्व प्रकारचे ऑपरेशन • मणक्याचे ऑपरेशन , २४ तास सुविधा उपलब्ध • लहान वेडे-वाकडे हात, पाय यावर शस्त्रक्रिया सांधेप्रत्यारोपण (जाँईट रिप्लेसमेंट)
• जखमा, भाजणे (बर्न्स) • २४ तास आपतकालीन सेवा • अपघात फॅक्चर अद्ययावत ऑपरेशन थिएटर, हार्निया, अपेंडीक्स चे शस्त्रक्रिया
• पित्ताशयाच्या शस्त्रक्रिया • पोटाच्या इतर शस्त्रक्रिया • किडणीच्या शस्त्रक्रिया • प्लास्टीक सर्जरी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.
अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरवर करा संपर्क
गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबिरा संदर्भात 02188-220011 अथवा 9146220011 या नंबर वर संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज