टीम मंगळवेढा टाईम्स ।
स्व.आमदार भारत नाना भालके करिअर अकॅडमी बालाजी नगर आणि ग्रामपंचायतमध्ये श्रीकांत पवार सर यांचे विनंतीवरून ग्रामीण भागातील
सर्वसामान्य कुटुंबातील मुला मुलींना पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीच्या अगोदर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहावे किरकोळ आजारावर निदान व्हावे, योग्य तो मार्गदर्शन आणि सल्ला मिळावा, म्हणून शिर्के मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मधील
डॉ. शरद शिर्के, डॉ.प्रीती शिर्के, डॉ. अभिजीत साळुंखे अस्थिरोग तज्ञ, डॉ.अमोल चव्हाण, डॉ.अमोल परदेशी यांचेकडून 150 प्रशिक्षणार्थी मुला मुलींची आणि ग्रामपंचायत बालाजी नगर येथील 200 लोकांची योग्य ती मोफत तपासणी करून विविध आजाराबरोबर डायट आणि शरीर फिटनेस संदर्भात मार्गदर्शन व सल्ला दिला.
डॉ.प्रीती शिर्के यांनी प्रशिक्षणार्थी मुलींना त्यांच्या विविध आजारावर कौन्सलिंग केले. सत्यसाई चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपूर शाखा यांचे समन्वयक संपत वाघाटे यांचेमार्फत गोळ्या औषध मोफत देण्यात आले.
आलेल्या सर्व डॉक्टर मान्यवरांनी त्यांनी दिलेल्या सेवेसाठी श्रीकांत पवार सर यांनी त्यांचे आभार मानून संस्थेच्या वतीने येतोचित मान व सन्मान केला. यावेळी आप्पासाहेब पवार सर विशाल जाधव गुरुजी सहकार्य केले.
भारत नाना भालके करिअर अकॅडमी अशी एकमेव प्रशिक्षण संस्था आहे जिथे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ,शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक अडचणी बरोबर आरोग्याकडे सुद्धा वैयक्तिक लक्ष देऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न सदैव केलं जातं.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज