टीम मंगळवेढा टाइम्स ।
नॅब नेत्र रुग्णालय मिरज व मंगळवेढा येथील शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या सौजन्याने गरजू नेत्र रुग्णांच्या सोयीकरता मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संचालक डॉ.शरद शिर्के यांनी दिली आहे.
उद्या मंगळवारी 11 ते 2 यावेळेत शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मुरलीधर चौक मंगळवेढा येथे शिबिर सुरू असणार आहे.
एक लाखांपेक्षा अधिक यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण केलेले.. सर्व प्रकारच्या नेत्रोपचारासाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव अग्रगण्य नेत्र रुग्णालय म्हणजे नॅब नेत्र रुग्णालय प्रसिद्ध आहे.
खास वैशिष्टे :
नेत्रोपचार व शस्त्रक्रिया नॅब नेत्र रुग्णालय, मिरज येथील नामवंत नेत्रतज्ञांमार्फत., मोतिबिंदूसाठी नेत्रभिंगारोपण शस्त्रक्रिया अल्पखर्चात., बिन टाका शस्त्रक्रिया (मशिनच्या सहाय्याने) अल्पखर्चात.
काचबिंदू, लासरू, डोळ्याची प्लास्टिक सर्जरी व तिरळेपणा यांचे योग्य निदान व उपचार., निरोपाच्यावेळी गॉगल्स मोफत दिले जातील.
विशेष सोयी :
शिबीराच्या दिवशीच मोतिबिंदू रुग्णांना नॅब नेत्र रुग्णालय, एम.आय.डी.सी. मिरज येथे नेण्यात येईल., रुग्णांना जाण्या-येण्याची व्यवस्था केली जाईल. रूग्णांची चहा व जेवणाची सोय केली जाईल.
सोबत येणाऱ्या व्यक्तीस चहा व जेवणाची अल्पखर्चात कॅन्टीनची सोय.
दरम्यान, सर्व प्रकारच्या नेत्रशस्त्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीने दुर्बिणीखाली नॅब नेत्र रुग्णालय, मिरज येथे होतील.
या शिबीरामध्ये चष्म्याचे नंबर काढून अल्पदरात चष्मे तयार करुन दिले जाणार आहेत.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व कामगार आरोग्य विमा योजना मान्यताप्राप्त रुग्णालय
या योजने अंतर्गत खालील उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.
• लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया. तिरळेपणा डोळ्याची पापणी पडणे. (Plosis) नेत्ररोपण (Keratoplasty) • नेत्रपटल (Retina) सर्व शस्त्रक्रिया. मधुमेहामुळे झालेल्या नेत्र आजारावर लेझर. अॅवास्टीन इंजेक्शन, ऑईल रिमुव्हल.
महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मोफत नेतृत्व तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर चालू राहणार आहे.
उद्या होणाऱ्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबंद शस्त्रक्रिया शिबिरास मंगळवेढा तालुक्यातील व परिसरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या प्रशासनाने केले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज