टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे डाॅ. अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत “मोफत मधुमेह” शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.शरद शिर्के यांनी दिली.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता योजना इत्यादी योजना शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे चालू आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी केसरी व पिवळे रेशन कार्ड असणाऱ्यांना आरोग्य योजना अंतर्गत मोफत उपचार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिक यांच्यासाठी विशेष सवलत यावेळी देण्यात येणार आहे.
तपासणी व सल्ला, रक्तातील साखर तपासणी,HbA1c, मधुमेहामुळे नसांना इजा झाल्याची तपासणी या तपासण्या विनामूल्य करण्यात येणार आहेत.
या शिबिरात कोणी सहभागी व्हावे
जास्त तहान लागणे, जास्त भूक लागणे, लठ्ठपणा असणे, वजन कमी होणे, अति थकवा जाणवणे, अंगावर सूज येणे ,अंधुक दिसणे, जखमा लवकर बऱ्या न होणे, वारंवार आजारी पडणे इत्यादी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या शिबिरात उपस्थित राहावे. विशेष औषधावर दहा टक्के सवलत देण्यात येईल.
●डी.एन.बी.मेडिसीन,(नवी दिल्ली),लिलावती हाॅस्पीटल मुंबई येथे सराव केलेले एम.बी.बी.एस.डाॅ.अमोल चव्हाण यांच्या देखरेखीखाली हे मोफत मधुमेह शिबिर संपन्न होईल.
शिबिर या ठिकाणी होत आहे
शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि आयसीयू एलएलपी , नवीन आयसीआयसीआय बँकेसमोर, मुरलीधर चौक मंगळवेढा. मो.9021578110,8956650654
तरी मंगळवेढा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक तसेच वरील सर्व लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या मोफत मधुमेह शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान हॉस्पिटलचे संस्थापक डॉ.शरद शिर्के यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज