टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा-मरवडे रोडवर तळसंगी गावच्या हद्दीत एका व्यापाऱ्याला अडवून ‘आम्ही पोलीस आहोत’ अशी बतावणी करत चौघांनी १ लाख ४५ हजार रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना काल सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, भररस्त्यात झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नेमकी घटना काय?
कर्नाटक राज्यातील देवाप्पा बिराप्पा मुनमुटगी (वय ३२, रा. सिद्दापूर, जि. यादगीर) हे आपल्या सहकाऱ्यांसह पिकअप वाहनाने पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे द्राक्ष खरेदी करण्यासाठी जात होते.

सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तळसंगी गावच्या हद्दीत पाठीमागून दोन दुचाकींवरून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी त्यांचे वाहन थांबवले.

वाहनातील प्रवाशांना “आम्ही पोलीस आहोत” असे सांगून या भामट्यांनी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना खाली उतरवले. गाडीची झडती घेण्याचे नाटक करत असताना, त्यांनी मुनमुटगी यांना हातातील १ लाख ४५ हजार रुपयांची रोख रक्कम गाडीच्या डॅशबोर्डमध्ये ठेवण्यास सांगितले.

प्रवाशांचे लक्ष विचलित करून डॅशबोर्डमधील रोकड अलगद लंपास केली आणि चौघेही आरोपी मरवडे गावाच्या दिशेने पसार झाले.

याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गु.र.नं. २३४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ब), २०४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वापरलेली वाहने: एक खाकी रंगाची बुलेट आणि एक काळ्या रंगाची मोटारसायकल. तपास अधिकारी: पोलीस हेडकॉन्स्टेबल खंडागळे यांच्याकडे पुढील तपास सोपवण्यात आला आहे.

अशा प्रकारे कोणीही पोलीस असल्याचे सांगून गाडी थांबवल्यास किंवा पैशांची मागणी केल्यास सावध राहावे. संशय आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.-दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलीस निरीक्षक, मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










