टीम मंगळवेढा टाईम्स ।
पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गाव म्हणून जे मंगळवेढा गाव ओळखले जात होते ते नाव पुसून आता मंगळवेढा हे आधुनिक शेती करणारे गाव म्हणून प्रसिध्दीस येवू लागले आहे.
मंगळवेढा येथील फौजदारी वकिल धनंजय हजारे यांचे घरनिकी येथील रायगड फार्म हाऊसवर पहिल्यांदा पपई लावलेल्या बागेवर ड्रोनव्दारा औषध फवारणी करण्यात आली.
त्यावेळी माहिती देताना अँड.हजारे यांनी सांगितले की, ड्रोनव्दारे फवारणी केल्याने १०० लिटरऐवजी २० लिटरमध्ये आणि औषधेही ५० टक्के बचत झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाचा मंगळवेढा येथे ड्रोनव्दारे फवारणी झाल्याने गावातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. याचा रिझल्टही फार चांगला मिळणार आहे. हे यंत्र आता सोलापूरातही उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – राज पाटील
ड्रोन तंत्रज्ञानातील कमतरता व खर्च यापुढील काळात कमी होऊन तंत्रज्ञान अधिक सक्षमपणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल. भविष्यातील गरज ओळखून कृषि विज्ञान केंद्राने या ड्रोन तंत्रज्ञानावर काम सुरु केले आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन राज पाटील यांनी केले.
ड्रोनमुळे वेळेची बचत
पाठीवरच्या पंपाने फवारणीच्या कामासाठी वेळ जास्त लागतो, पाणी व कीटकनाशकांचे ओझेही पाठीवर घ्यावे लागते. अनेकदा फवारणी न झाल्याने पीक उत्पादकतेत घट येते.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, वेळेची बचत, श्रम कमी करणे यासोबतच सुरक्षित फवारणी करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान उपयोगी असल्याचे अँड.धनंजय हजारे यांनी सांगितले.
शेतीसाठी ड्रोन वापराच्या एसओपीमागील हेतू
भारतीय शेतीमध्ये आतापर्यंत बरीच प्रगती झाली आहे. शेतकऱ्यांनी संशोधन व नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे त्याचा त्यांना फायदा झाला आहे. शेतकरी ठिबक सिंचन आणि विविध प्रकारच्या यंत्रे भारतातील शेतीसाठी वापरली जात आहेत.
ड्रोन आता शेतीमध्ये औषध फवारणी करताना महत्त्वाचा ठरणार आहे. ड्रोनमुळे पीक फवारणीसाठी लागणारं मनुष्यबळ नक्कीच कमी होईल. तसेच पाण्याचे प्रमाण आणि रसायनांचे प्रमाण ड्रोन वापरण्यापेक्षा कमी होईल.
या यंत्राद्वारे ७ मिनिटांत १ एकर शेतातील पिकावर कीटकनाशकाची फवारणी केली जाऊ शकते. यात रडार सिस्टिमचा अंतर्भाव आहे. त्यामुळे यंत्र उडताना खाली न जाता थेट उंचीवर जाते. त्यानंतर फवारणी करून उड्डाण घेतलेल्या जागेवर पुन्हा येऊन थांबते. यंत्राला सेंसर असल्याने मार्गात विजेचे तार किंवा खांब येत असल्यास तेवढा परिसर सोडून आजूबाजूने तो मार्गक्रमण करतो.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज