मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।
सोलापुरातील होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा करण्यासाठीच्या हालचाली वाढल्या आहेत. आता सोलापूर-हैदराबादसाठी अलायन्स एअर
तर पुणे, मुंबई, तिरूपतीसाठी इंडिगो, गो फर्स्ट, फ्लाय बिग, स्टार एअर, अलायन्स एअर, स्पाइस जेट, आकासा एअर, विस्तारा या कंपन्या सरसावल्या असल्याची माहिती सोलापूर विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
विमान सेवेस अडथळा ठरणारी सिद्धेश्वर ची अनधिकृत चिमणी पाडली. त्यानंतर सोलापूर विचार मंच तर्फे एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडिया, सोलापूर यांची भेट घेऊन
डीजीसीए, एअरपोर्ट अथोरिटी व नागरी उड्डाण मंत्रालयास सोलापुरातून तातडीने मुंबई, हैदराबाद, बेंगलोर,नवी दिल्ली, चेन्नई व तिरुपती या ठिकाणी उडान योजनेअंतर्गत विमानसेवा सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता.
त्यास तत्परतेने आरसीएस- उडान योजनेचे सरव्यवस्थापक अतुल्य अग्रवाल यांनी मेल पाठवून डीजीसीकडून सोलापूर विमानतळास लायसन्स मिळताच
सोलापूर ते हैदराबाद ७२ सीटर एटीआर विमानसेवा अलायन्स एअर ही कंपनी देऊ शकते. तसेच इतर ठिकाणांसाठी बाकी कंपन्या आपले प्रस्ताव पाठवतील असे सांगितल्याची माहिती डॉ. संदीप आडके यांनी दिली.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज