सुरज फुगारे । मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा सामाजिक क्षेत्रात योगदान प्रतिसाद देणाऱ्या रतनचंद शहा सहकारी बँकेने कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या या लढ्यात आर्थिक योगदान दिले असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे अडीच लाख , तर प्रधानमंत्री कक्षाकडे अडीच लाख रुपये मदत देण्यात आली.पाच लाखांचा धनादेश प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांनी सुपूर्द केला.
याप्रसंगी व्हा.चेअरमन रामचंद्र जगताप, संचालक लक्ष्मण नागणे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने राज्यावर आलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्यातील जनतेला मुख्यमंत्री उद्धव सहकारी ठाकरे यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते , तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारनेदेखील प्रधानमंत्री सहायता निधी या नावाने आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बँकेकडून ही मदत करण्यात आल्याची माहिती शहा यांनी दिली.
मंगळवेढा शहरात रात्रंदिवस आपल्या जीवाची पर्वा न करता येथील पोलिस ठाण्याचे कर्मचारी काम करीत आहेत. त्यांच्यासाठी समाजातील विविध संस्थांनी जेवणाची व्यवस्था केली. यामध्ये रतनचंद शहा बँकेकडून दहा दिवस येथील सर्व पोलिस बांधवांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
तसेच पोलिस व पत्रकारांना मास्कचे वाटप देखील करण्यात आले होते. सत्ताव्वन वर्षापासून रतनचंद शहा सहकारी बँकेकडून समाजातील विविध आवाहनाला प्रतिसाद देत मदतीचे काम केले असून सभासद व बँकेच्या ग्राहकांच्या वतीने या कार्याचे कौतुक होत आहे.
—————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज