मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापुरातून एक खळबळजनक बातमीसमोर आली आहे. यात शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणअचानक बेशुद्ध झाल्याचेसमोरआलंआहे. यातपाच जणांच्याही तोंडाला फेस आलेल्या अवस्थेत आढळून आल्याने या पाच ही जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
मात्र उपचारा दरम्यान पाच पैकी दोघां चिमुकल्या बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . तर तिघांवर अद्याप ही उपचार सुरु आहे . मात्र या घटने मागील नेमकं कारण काय हे अद्याप कळू शकलेलं नाहीये.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील गॅस गळतीमुळे हा धक्कादायक प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोलापुरातील लष्कर भागातील हि घटना असून काल रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास हे सर्व कुटुंब बेशुद्धा अवस्थेत असल्याचे समजले. शिवाय यावेळी त्यांच्या तोंडाला फेसदेखील आलेला होता.
परिणामीत्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता संध्याकाळी दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
छोट्याशा खोलीत वायू पसरून सर्वजण बेशुद्ध झाल्याचा प्राथमिक अंदाज
दरम्यान, झोपताना गॅस व्यवस्थित बंद न केला नाही त्यामुळे छोट्याशा खोलीत वायू पसरून सर्वजण बेशुद्ध झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात युवराज मोहन सिंग बलरामवाले (वय 40), रंजना युवराज बलरामवाले (वय 35), विमल मोहन सिंग बलरामवाले (वय 60) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तर हर्ष बलरामवाले (वय 6), अक्षरा बलरामवाले(वय 4) यांचा यात दुर्दैवी मृत्यू झालाय. या पाच जणांच्या कुटुंबातील रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
तर बलरामवाले कुटुंब दोन दिवसापूर्वीच तिरुपतीवरून दर्शन घेऊन परतले होते. मात्र या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युवराज हा गवंडी तर रंजना ही विडी कामगार म्हणून काम करते, आई विमल ही एका रुग्णालयात कामाला होती. रंजना हिच्या सोबत काम करणाऱ्या शेजारील महिला घरी गेली असता संपूर्ण कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने हा प्रकार समोर आलं आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज