mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर; आ.समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 8, 2023
in मंगळवेढा
गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये सन २०२३-२४ या वर्षातील विविध विकास कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

सदर निधीतून मतदारसंघाच्या पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांच्या दलित वस्तीमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी व्यायामशाळा बांधणे, अभ्यासिका उभारणे, समाज मंदिर बांधणे व दुरुस्ती करणे, संविधान भवन बांधणे, दलित वस्ती अंतर्गत रस्ते सुधारणा व कॉंक्रिटीकरण करणे आदी विकास कामांचा समावेश असल्याची माहिती आ. आवताडे यांनी दिली आहे.

पंढरपूर तालुक्यातील निधी मंजूर गावांची नावे व निधी –

उंबरगाव येथील दलित वस्ती नंदू आहेरकर घर ते चिंतामणी गायकवाड वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, तावशी येथे दलित वस्तीसाठी समाज मंदिर बांधणे १० लाख, गोपाळपूर येथे दलित वस्तीसाठी समाज मंदिर बांधणे १० लाख, मुंढेवाडी येथे दलित वस्तीसाठी समाज मंदिर बांधणे १० लाख,

रांझणी येथे अण्णाभाऊ साठे नगर मध्ये वाचनालय बांधणे १० लाख, ल. टाकळी येथील जिल्हा परिषद शाळा ते महालक्ष्मी मंदिर दलित वस्ती अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, सिद्धेवाडी येथील दलित वस्ती मध्ये अभ्यासिका बांधणे ७ लाख व सज्जन मस्के घर सारंग भोपळे घर रस्ता सुधारणा करणे ५ लाख,

तसेच तरटगाव ते गोरख क्षीरसागर घर (दलित वस्ती) पोहोच रस्ता करणे ३ लाख, कासेगाव येथील निळा झेंडा चौक ते अण्णाभाऊ साठे नगर रस्ता सुधारणा करणे १० लाख, कुरे वस्ती शाळा ते आप्पा वाघमारे वस्ती दलित वस्ती रस्ता सुधारणा करणे १० लाख, अण्णाभाऊ साठे नगर दलित वस्तीमध्ये वाचनालय बांधणे १० लाख, गादेगाव येथे मातंग समाज दलित वस्ती मध्ये पाण्याची टाकी बांधणे ५ लाख,

दलित वस्ती मधील गावठाण नं.१ शेजारील रस्ता सुधारणा करणे ५ लाख, बोहाळी येथील दलित वस्तीमध्ये महार नोर खोरा येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे ५ लाख, दलित वस्तीमध्ये चंदनशिवे रणदिवे वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, शेटफळ येथील दलित वस्ती शेटफळ-कासेगाव ते शेटफळ-खर्डी रस्ता सुधारणा करणे १० लाख, कौठाळी दलित वस्ती संत रोहिदास नगर गावठाण काँक्रिटीकरण करणे ५ लाख,

शिवाजी चव्हाण वस्ती ते अण्णाभाऊ साठे नगर मस्के वस्ती पोहोच रस्ता करणे १० लाख, शिरढोण येथील पुनर्वसन गावठाण दलित वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख, दलित वस्ती मध्ये सार्वजनिक शौचालय बांधणे १० लाख, वाखरी येथील प्रभू कृष्णा घोडके दलित वस्ती पोहोच रस्ता करणे १० लाख,

एकलासपूर येथील दलित स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १०, तनाळी येथील दलित वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे १० लाख, अनवली येथील दलित वस्ती अंतर्गत मरीआई मंदिर व खंडोबा मंदिर शेजारी पेव्हिंग ब्लॉक बसवणे ५ लाख, गवळी वस्ती (दलित वस्ती) अंतर्गत पोहोच रस्ता करणे

मंगळवेढा तालुक्यातील निधी मंजूर गावांची नावे व निधी –

ब्रह्मपुरी येथील दलित वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे १० लाख, लोणार येथे समाजमंदिर बांधणे ७ लाख, हुन्नूर येथे दलित वस्ती मध्ये अभ्यासिका बांधणे ७ लाख, मरवडे येथील इंदिरानगर मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मोटार, बोअर, हौद करणे ५ लाख, मरवडे येथील आंबेडकर मैदान सुशोभीकरण करणे ५ लाख, पौट येथील दलित वस्तीमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवणे ५ लाख,

आसबेवाडी येथील दलित वस्ती मध्ये अभ्यासिका बांधणे ७ लाख, रड्डे येथील भीम नगर मध्ये बौद्धविहार बांधणे १० लाख, शिरनांदगी येथील चौगुले- जावीर वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे ७ लाख, चिक्कलगी येथील माळवाडी येथे दलित वस्तीमध्ये समाज मंदिर बांधणे ७ लाख, खोमनाळ येथे मागासवर्गीय स्मशानभूमी मध्ये शेड बांधणे ५ लाख,

सलगर बु येथील मायाक्का मंदिर ते दलित वस्ती मधील भोरकडे वस्ती कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे ५ लाख, आंधळगाव येथील दलित वस्ती मध्ये जिल्हा परिषद शाळा ते काळंबादेवी मंदिरापर्यंत गटार बांधणे १० लाख, बठाण येथील मागासवर्गीय स्मशानभूमी पर्यंत जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख,

सोड्डी येथील मागासवर्गीय स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, रहाटेवाडी येथील दलित वस्ती मधील मरिआई मंदिर ते जिल्हा परिषद शाळा जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे ७ लाख, चोखामेळा नगर येथील दलित वस्ती अंतर्गत आवताडे क्रशर ते महात्मा गांधी मागासवर्गीय कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेपर्यंत जाणारा रस्ता सुधारणा करणे ७ लाख, माचणूर येथे दलित वस्ती मध्ये जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १५ लाख,

लक्ष्मी दहिवडी येथील दलित वस्ती मधील रोहिदास गल्ली ते ज्योतिर्लिंग मंदिरापर्यंत रस्ता सुधारणा करणे १० लाख, अरळी येथे दलित वस्ती येथील सावंत वस्तीमध्ये अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे १० लाख, तळसंगी येथील मागासवर्गीय वस्तीत गट नं १७१ मध्ये अभ्यासिका बांधणे १० लाख, घरनिकी येथे दलित वस्तीमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवणे ५ लाख, मारापुर येथे दलित वस्तीमध्ये समाज मंदिर बांधणे १० लाख,

हुलजंती येथे दलित वस्ती मध्ये संत रोहिदास मंदिरासमोर समाज मंदिर बांधणे १५ लाख, डोंगरगाव ते दलित वस्तीतील खडतरे वस्ती रस्ता सुधारणा करणे १० लाख, जालिहाळ येथील दलित वस्ती अंतर्गत जावीर वस्ती कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे ५ लाख,

भोसे- शिरनांदगी रस्त्यावरून दलित वस्ती अंतर्गत निवृत्ती खडतरे वस्तीपर्यंत रस्ता सुधारणा करणे १० लाख, पाठकळ ते डोंगरगाव रस्त्यावरून दलित वस्ती अंतर्गत पांडुरंग खडतरे वस्ती कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे १० लाख, नंदेश्वर येथील भीमनगर मध्ये आंबेडकर भवन बांधणे १५ लाख, डोंगरगाव ते दलित वस्ती अंतर्गत सोपान खडतरे वस्ती कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे १० लाख,

गुंजेगाव येथील दलित वस्ती अंतर्गत प्रमोद ढोबळे घर ते राजू शिरतोडे घर रस्ता सुधारणा करणे ५ लाख, भोसे येथील दलित वस्तीतील बुद्ध विहार दुरुस्ती व सुशोभीकरण करणे ७ लाख, सलगर खु.दलित वस्ती अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, हिवरगाव गावठाण ते इंदिरानगर दलित वस्तीमध्ये पथदिवे बसविणे व दलित वस्ती अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे १० लाख, नंदेश्वर शिरसी रस्ता ते दलित वस्ती अंतर्गत बापू खडतरे वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, जित्ती येथील दलित वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या शिक्षण, आरोग्य, रस्ते पाणी या सुविधा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी या महत्त्वकांक्षी योजनेमार्फत हा भरीव निधी मंजूर झाला आहे. मंजूर झालेल्या सदर निधीमुळे मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व धोरणात्मक विकासासाठी मोठी चालना मिळणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: समाधान आवताडे

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
Next Post
दुर्दैवी! मंगळवेढा तालुक्यात पावसाचा हाहाकार, वीज पडून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू

दुष्काळात तेरावा! मंगळवेढयात वीज पडून गाय मृत्यूमुखी; पावसामुळे 'या' पिकास मिळाले जीवदान

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा