टीम मंगळवेढा टाईम्स ।
मित्राच्या सुखात कमी , पण दुःखात सहभागी होणं हीच खरी मैत्री असते , बार्शीतील छत्रपती ग्रुपचे प्रमुख अजय टिंकू पाटील यांनी आपलं हेच मित्रप्रेम कर्तृत्वातून दाखवून दिलंय.
आपल्या दिवंगत मित्राच्या मुलीच्या नावे त्यांनी २५ हजारांची एफडी भविष्य निधी पोस्ट खात्यात जमा केली.
बार्शी येथे शिवजयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने व बापू पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अजय पाटील यांनी गौरी नवनाथ रोडे या ४ वर्षांच्या चिमुकलीच्या नावे २५ हजार रुपयांची पोस्ट खात्यात एफडी जमा केली.
भाजप महिला आघाडीच्या नेत्या अँड. राजश्री डमरे तलवाड यांच्या हस्ते पोस्ट खात्याचं हे पासबुक चिमुकलीच्या आईच्या हाती सुपुर्द करण्यात आले.
यावेळी स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे, बार्शी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष संजय बारबोले , पत्रकार धैर्यशील पाटील , मयूर गलांडे , धीरज शेळके, जय शिवराय प्रतिष्ठानचे विजय राऊत , उडान फाउंडेशनचे इरफान शेख आदी उपस्थित होते.
दिवंगत पालक नवनाथ रोडे हे बार्शीतील एका रस्सी उत्पादन कारखान्यात कामाला होते.
गतवर्षी त्यांचे अकाली निधन झाल्याने , रोडे कुटुंबीयांवर दु : खाचा डोंगर कोसळला. या दुःखी कुटुंबाला आधार देऊन आर्थिक मदत देण्याचे काम पाटील यांनी करून मित्राच्या मृत्यूनंतरही मैत्री जपली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज