मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
नियती ती नियतीच असते, ती परीक्षा घेणारच. मात्र, अशा परिस्थितीवरही मात करता आली तर सर्वकाही जिंकल्यात जमा आहे. हेच धाडस गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील आदेश कटरे याने दाखवले आहे.
इयत्ता 10वी मध्ये असलेल्या आदेशचा आज मराठी विषयाचा पेपर होता. पेपरचे मानसिक दडपण असतानाच त्याचे वडील ठानेश्वर कटरे यांचा आज पहाटे आकस्मिक निधन झाले.
वडिलांचा मृतदेह दारात असताना परिक्षेला जावे तरी कसे? असा सवाल त्याच्या मनात घोळत होता. मात्र, पेपरच्या गैरहजरीने पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाणार यामुळे आदेशने मन घट्ट करुन वडिलांचा मृतदेह दारात असताना पेपर देण्याचा निर्णय घेतला. पेपर सुटल्यानंतर मग त्याने वडिलांवर अंत्यसंस्कार केलं आहे.
क्रूर नियतीनेही घेतली आदेशची परीक्षा
नियतीचा खेळ वेगळाच असतो. नियती कधी कुणाला रडवेल कुणाला हसवेल याचा नेम नाही. बापाचे छत आणि मायेची ऊब मिळते ते नशिबानेच म्हणावे लागेल. गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील ठानेश्वर कटरे यांचा शुक्रवारी पहाटे निधन झाले. तर ठाणेश्वर कटरे यांचा मुलगा यंदा दहावीत होता.
काल त्याचा पहिलाच पेपर. मात्र नियतीने आदेशच्या नशिबात काही वेगळेच ठरविलेले. नशिबाने काय ठरविलेले याचा मागमूसही आदेशला नाही. अशातच डोक्यावरील बापाचे छत कायमचे शुक्रवारी पहाटे उडाले. घरातील एकूलता एक मुलगा दहावीचा पहिला पेपर देण्यासाठी मोहाडी येथे जाणार होता.
मात्र पहाटे वडिलांचा मृतदेह घरात असतांना मुलगा दहावीच्या परीक्षेला मोहाडी केंद्रात पेपर द्यायला जातो. काय मनस्थिती असेल आदेशची. मात्र त्याने दु:ख बाजूला सारून दहावीची परीक्षा दिली.
आदेश ठाणेश्वर कटरे हलाखीच्या परिस्थितीतही शिक्षण घेतोय. घरात अठरा विश्व दारिद्र्य या सर्वात वाट मोकळी करीत आदेशची शिक्षणासाठी धाडसी धडपड कौतुकास्पद आहे. एकीकडे आदेशच्या वडिलांचा घरी मृतदेह आणि दुसरीकडे मोहाडी केंद्रात आदेशच्या हातात मराठीचा पेपर.
जिथे आयुष्यातील गणित बिघडली असतील तिथे मराठीचा पेपरला सोडवायचे कसे? हा प्रश्न अधोरेखित होता. अशातच आदेश कटरे याने मोहाडी येथे सकाळी 11 वाजेच्या सुमारास दहावीची परीक्षा दिली. एकीकडे मुंडीपार येथील राहते घरी अंथरुणावर मृतक बाप तर दुसरीकडे मोहाडी येथील परीक्षा केंद्रावर आदेशच्या हातात मराठीचा पेपर.
दोन्हीपैकी एकाला वेळेवर निवडायचे ही सत्वपरीक्षा आदेशच्या आयुष्याची परीक्षा घेणारी होती. यापैकी आदेश ने एका तासात मराठीचा पेपर सोडवून सामाजिक बांधिलकी जोपासली.
वडील हेच शेवटचे परमेश्वर. नापास झालो तर परीक्षा पुन्हा देता येईल. वडिलांसोबत हा शेवटचा प्रवास. वडिलांना साथ द्यावी लागेल या आत्मविश्वासात आदेश मोहाडी येथून मराठीचा पेपर एक तासात सोडून घरी माघारी परत आला. वडिलांच्या मृतक शरीराला त्यांनी खांदा दिला.
आणि सायंकाळी वडील ठाणेश्वर कटरे, मुलगा आदेश यांच्या उपस्थितीत अनंतात विलीन झाले. या सर्व संवेदनशील प्रसंगाचे गावकरी साक्षीदार झाले. आदेश ला परीक्षेसाठी परीक्षा देण्यासाठी शिक्षक रमेश बिसेन व क्षत्रिय पवार समाज संघटनेचे सचिव मोरेश्वर चौधरी यांनी प्रोत्साहित केले.
मोहाडीच्या सरपंचांनी केले आदेशचे सांत्वन
या घटनेची माहिती मिळताच मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र चौरागडे, माजी सरपंच धृर्वराज पटले व इतर ग्रामपंचायत सदस्य गावक-यांनी मोहाडी येथील दहावीच्या परीक्षा केंद्राला भेट दिली. यावेळी आदेश कटरे यांची भेट घेतली व त्याचे सरपंच नरेंद्र चौरागडे यांनी सांत्वन केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज