टीम मंगळवेढा टाईम्स ।
यावर्षी साखर उद्योगाला चांगले दिवस आहेत. गेल्या वर्षीही साखर उद्योगाला चांगले दिवस होते. त्यामुळे कारखानदारांनी ज्यांनी कारखाने चांगले चालवले त्यांच्याकडे पैसा आला आहे.
यंदा आपल्या सुदैवाने महाराष्ट्रात चांगला पाऊस पडला मात्र त्याचवेळी जगात जास्त साखर उत्पादन घेणाऱ्या ब्राझील या देशात दुष्काळ पडल्यामुळे जगात यंदा प्रथमच साखरेची उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. कारखाना व उसाच्या प्रश्नांवर ते बोलत होते.
आपल्या देशामध्ये आपल्या गरजेपेक्षा जवळपास १०० लाख टन साखरेचे उत्पादन जास्त झालं. ऐरवी ३०/४०लाख टन साखर जरी जास्त उत्पादित झाली तर देशासमोर ती साखर कुठे विकायची हा मोठा प्रश्न उभा राहत होता?त्यासाठी सबसिडी देऊन साखर बाहेर विकली जात होती.
मात्र यंदा ब्राझील देशात दुष्काळ पडल्याने साखरेचे व इथेनॉलचे उत्पादन या देशात मोठ्या प्रमाणात खाली गेले. जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे व जगात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने इथेनॉलला जादा दर मिळत आहे.
त्यामुळे साखर निर्मिती पेक्षा थेट इथेनॉल निर्मितीवर अधिक भर दिला. त्यामुळे ब्राझीलची साखर जागतिक बाजारपेठेत न आल्यामुळे साखरेचे दर वाढले आहेत.
दरवेळी जागतिक बाजारपेठ व स्थानिक बाजारपेठ यात साखरेच्या दरात मोठी तफावत असते. भारतातील साखर सबसिडी देऊन निर्यात करावी लागत होती.
मात्र सुदैवाने यंदा कच्चा साखरेलाही ३२०० ते ३३०० रुपये दर मिळत असल्याने बहुतेक कारखान्यांनी कच्ची साखर निर्यात केली त्यामुळे कारखान्यांकडे पैसा पैसा आलेला आहे.
अशातच केंद्र सरकारने थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना परवानगी दिली आणि त्यापासून निर्माण होणारे इथेनॉलला ६२ रुपये दर दिला.
इथेनॉलच्या उत्पादनाला थेट ६२ रुपये दर मिळाल्यामुळे साखरेच्या उत्पादनापेक्षा अनेक कारखान्यांनी इथेनॉलचे उत्पादन घेतले.त्यांना अगदी कमी दिवसात फक्त १५ दिवसांत रोख पैसाही मिळाला.
यामागे केंद्र सरकारचा उद्देश होता साखरेचे उत्पादन कमी करणे. त्यामुळेच इथेनॉलला जास्त दर दिल्याने साखरेचे उत्पादन कमी झाले व इथेनॉलचे उत्पादन वाढले.
चालू वर्षीही ब्राझील मधील परिस्थिती सुधारली नसून यंदाही अशीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे या दोन वर्षातच भारतातील साखर उद्योगांना सुधारण्यास वाव आहे.
कारण अशी सुवर्णसंधी असा सुवर्णकाळ पुन्हा पुन्हा येईल अशी गॅरंटी नाही. ही सुवर्णसंधी आहे असे समजून कारखानदारांनी कारखाने चांगले चालवले पाहिजे काटकसरीने चालवली पाहिजे.
असा मोलाचा सल्लाही त्यांनी कारखानदारांना दिला. कारखाने पूर्ण क्षमतेने चालवले पाहिजेत.अधिक ऊस उत्पादन होते. म्हणून रडत बसण्यापेक्षा सध्याची सुवर्णसंधी समजून घेऊन त्याचा लाभ उठवला पाहिजे.
परंतु दुर्दैवाने काय झाले आहे की साखर कारखानदारांना शेतकऱ्यांचे पैसे वापरायचे ते बुडवायची सवय लागली आहे. या चुकीच्या मुळे किंवा प्रवृत्तीमुळे कारखान्याच्या जवळचा चांगला ऊस बाहेरच्या कारखान्याला जायला लागला व कारखान्यावर वाईट दिवस येऊ लागले खरे तर अशा बुडव्या कारखानदारांना शेतकऱ्यांनी धडा शिकवला पाहिजे.
व्यावसायिक पद्धतीने कारखाने चालवणारे पुढे आले पाहिजे मग ते जे कोणी असतील खाजगी असो किंवा सहकारी तत्त्वावरील असो त्यांना शेतकऱ्यांनी साथ दिली पाहिजे.
कारण आता खताच्या एका पोत्यासाठी दोन दोन हजार रुपये द्यावे लागतात.त्यामुळे टाईमपास म्हणून शेती करायची दिवस आता गेलेले आहेत. असेही ते म्हणाले.
व्यवसायिक शेती करायला शेतकऱ्यांनी शिकले पाहिजे व ज्यांच्याकडे व्हिजन आहे दिशा आहे अशा कारखानदारांनाच शेतकऱ्यांनी साथ दिली पाहिजे पाठीशी घातले पाहिजे व ऊस दिला पाहिजे यातच शेतकऱ्यांचा व कारखानदारांचा हित आहे. असा मोलाचा सल्लाही शेट्टी यांनी दिला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज