टीम मंगळवेढा टाईम्स ।
आपल्या शेतातील खरीप पिकांची नोंदणी शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाइलद्वारे करण्यास दि. १ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांनी पीक पाहणी सहायकावर अवलंबून न राहता
मोबाइल अॅपद्वारे १५ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन महसूलच्या अप्पर जिल्हाधिकारी तथा राज्य संचालक सरिता नरकेयांनी केले आहे.
दि. १५ ऑगस्ट २०२१ पासून शासनाने ई-पीक पाहणी मोबाइल अॅपच्या सहाय्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाइलद्वारे ७/१२ उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी दि. १ ऑगस्टपासून ही नोंदणी सुरू झाली आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून, रब्बी हंगाम २०२४ पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सव्हें प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे.
सध्या खरीप हंगामातील पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणी मोबाइल अॅपचे व्हर्जन 4.0.0 अद्ययावत स्वरुपात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध केले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे अॅप अपडेट करून घ्यावे. खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी
दि. १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत तर सहायक स्तरावरील पीक पाहणी १५ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहायकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच व वेळेतपूर्ण करावी.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज