मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना कोथाळे (ता. मोहोळ) येथे घडली. याप्रकरणी सावकारी करणाऱ्या चौघांवर कामती (बु) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सोमनाथ वसंत पवार (वय ३०, रा. कोथाळे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
राजाराम गोरख सलगर, तुकाराम बापू तेरवे, लिंगदेव सलगर व काकासाहेब दशरथ सलगर (सर्व रा. पुळूजवाडी, ता. पंढरपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित खासगी सावकारांची नावे आहेत.
सोमनाथ हा वडील वसंत पवार, पत्नी अश्विनी आणि विराज व स्वरा या दोन मुलांसह शेतीवर उपजीविका करून गावात राहात होता. दरम्यान, २०१९ झाले. मध्ये त्याने तुकाराम बापू तेरवे व राजाराम गोरख सलगर यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते.
संबंधितांनी व्याजासह रक्कम परत दे म्हणून सतत तगादा लावल्याने सोमनाथने काही जमीन विकून अनुक्रमे राजाराम सलगर व तुकाराम सलगर यांचा संपूर्ण व्यवहार पूर्ण केला होता. ही बाब २०२० मध्ये कुटुंबीयांना समजली होती.
यावेळी राजाराम सलगर व तुकाराम तेरवे यांना अनुक्रमे सात लाख व नऊ लाख रुपये जमीन सोडवून घेत सर्व व्यवहार पूर्ण केला होता. दरम्यान, गुरुवारी (ता. २५) राजाराम सलगर, लिंगदेव कृष्णा सलगर, काकासाहेब दशरथ सलगर यांनी
पुन्हा सोमनाथला कोथाळे येथे त्याच्या घरी येऊन, तुझ्याकडे आमचे आणखी पैसे आहेत, कधी देणार? असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली.
या घटनेच्या आदल्या दिवशीही गावातील डेअरीसमोर सोमनाथचा मुलगा विराज याच्यासमोरही शिवीगाळ करीत पैसे दे म्हणून दमदाटी केली होती. या घटनेमुळे सोमनाथला मानसिक धक्का बसल्याने त्याने शुक्रवारी (ता. २६) रात्री विष प्राशन केले.
पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याने त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांना हाक देऊन जागे केले. यावेळी त्याच्या वडिलांनी शेजारांच्या मदतीने सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, प्रवासात त्याने आपल्या वडिलांना व सोबतच्या लोकांना, वरील चौघांनी पैसे देऊनही आणखी पैसे देण्यासाठी लावलेला तगादा, केलेली शिवीगाळ व दमदाटीमुळे मानसिक त्रास झाल्याने आपण हा प्रकार केल्याचे सांगितले. दरम्यान, त्याचे निधन झाले.
या घटनेनंतर त्याचे वडील वसंत ब्रह्मदेव पवार (वय ६५) यांनी सोमनाथ आत्महत्या करण्यासाठी राजार सलगर, तुकाराम तेरवे, लिंगदेव सल व काकासाहेब सलगर यांनी प्रव केल्याची फिर्याद कामती पोलिसांत दिली आहे. त्या चौघांविरुद्ध खासगी सावकारी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, कामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी सुखदेव गोदे तपास करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज