मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
टेंभुर्णी-कुईवाडी रोडवरील तांबवे पाटी खटके वस्ती येथे माढेश्वरी बँकेतून काढलेले ९० हजार रुपये दमदाटी करून नेल्याची फिर्याद लक्ष्मण आत्माराम सरक (वय ६०, रा. बदलेवाडी, ता. माढा) यांनी दि. २७रोजी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दिली होती.
गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला होता. या संदर्भात टेंभुर्णी पोलिसांनी शहरातील सीसी टीव्ही फुटेजची पाहणी केली असता, त्यांना तथ्य आढळून आले नाही. फिर्यादीने कर्ज झाले असल्याने बनाव केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
फिर्यादी माढेश्वरी बँक, शाखा टेंभुर्णी या शाखेतून ९० हजार रुपये पीककर्ज घेऊन फिर्यादी त्यांच्या मोटारसायकलवरून घरी जात असताना कुईवाडी-टेंभुर्णी माढा तालुक्यातील
तांबवे गावच्या शिवारातील खटके वस्तीजवळ आले असता फिर्यादीच्या मोटारसायकलीच्या पाठीमागून दोघांनी मोटारसायकलवरून येऊन फिर्यादीच्या दुचाकीला त्यांची मोटारसायकल आडवी लावून दोन चोरट्यांनी दमदाटी करून रोख पैसे काढून घेतल्याबाबत फिर्याद दिली होती.
शेतकऱ्याच्या घरातून पैसे पोलिसांनी केले जप्त
फिर्यादी हे वयस्कर व त्यांना बीपीचा-शुगरचा त्रास होता. ते शेतकरी असल्याने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. परंतु फिर्यादी हे कर्जबाजारी असल्याने त्यांच्याकडे गावातील लोक पैसे मागतात. ते मागू नयेत या कारणावरून त्यांनी चोरी झाल्याचा बनाव केला असे निष्पन्न झाले.
त्यांच्याकडून घरात पेटीत ठेवलेले २० हजार रुपये हस्तगत करण्यात आले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक दीपक पाटील, पोलिस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, अजित मोरे, विलास रणदिवे, प्रवीण साठे, विनोद साठे, नलावडे व गुन्हे शाखेच्या पथकाने हा बनाव उघडकीस आणला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज