टीम मंगळवेढा टाईम्स।
अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा 2023-24 या वर्षाकरिता अर्थसंकल्प सादर केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून मांडलेला पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी पेटारा उघडला आहे.
केंद्रातील पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना या धर्तीवर ‘नमो शेतकरी सन्मान निधी’ योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्राच्या 6 हजार रुपयांसह महाराष्ट्राचे 6 हजार जमा होतील. म्हणजे वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यावर 12 हजार रुपये जमा होतील.
यात महिलांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या असून त्यात महत्त्वाची म्हणजे सर्व महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सुट मिळणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत मिळेल अशी घोषणा फडणवीस यांनी केली. याआधी राज्यात ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत करण्यात आला आहे. यानंतर महिलांना ५० टक्के सवलतीचा हा निर्णय मोठा मानला जात आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधी नेमका काय?
– नमो शेतकरी महा सन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे.
– या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला ६ हजार रुपये जमा करेल.
– केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला २ हजार रुपये
शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
– याप्रमाणेच आता राज्य सरकारही दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा करेल.
– यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राचे ६ हजार आणि महाराष्ट्र सरकारचे ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये जमा होतील.
2023-24 मध्ये सहा हजार 900 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावीत
‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा’ लाभ राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी 2023-24 मध्ये सहा हजार 900 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावीत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या अन्य घोषणा
शाश्वत शेती समृध्द शेती
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली जाईल. नमो शेतकरी महायोजना
प्रतिवर्ष केंद्र सरकार 6 हजार देतं त्यात अजून 6 हजार यांची भर घालतो. याचा लाभ 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना होणार
पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्याला फक्त 1 रूपया भरावा लागेल. शेतकऱ्याच्या वतीचा हफ्ता सरकार भरेल.
महाकृषी विकास अभियान जाहीर
एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार.
शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होण्यासाठी सौरऊर्जा पंप देण्यात येतील
‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात
लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची… असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात मांडली. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आहे.
पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये , अकरावीत 8000 रुपये
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
महिलांच्या आरोग्यासाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत चार कोटी महिला व मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येतील. राज्यातील अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे वीस हजार पदे भरण्यात येतील.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखावरून पाच लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली.
बचत गटांच्या माध्यमातून ३७ लाख ग्रामीण महिलांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहे. बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पल क्लस्टर हे विकसित करण्यात येईल. केंद्र शासनाने अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे मुंबई येथे युनिटी मॉलची स्थापना करण्यात येईल, त्यामध्ये बचत गटांना जागा देण्यात येईल.
राज्यात सुमारे ८१ हजार आशा स्वयंसेविका साडेतीन हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत अशा स्वयंसेविकेचे सध्याचे मानधन ३५०० रुपये तर गटप्रवर्तकांचे मानधन ४७०० रुपये आहे या मासिक मानधनात प्रत्येकी दीड हजार रुपये एवढी वाढ करण्यात येत असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.
(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज