टीम मंगळवेढा टाईम्स।
रस्त्याची वहिवाट व अतिक्रमणाच्या कारणावरुन एका ५४ वर्षीय महिलेस काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी यशवंत किसन मुदगूल व पत्नी कांता यशवंत मुदगूल (रा. किल्ला भाग) या दोघा पती, पत्नी विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, दि.६ रोजी दुपारी १ वाजता यातील जखमी फिर्यादी भारती शिवदास मोहिते या घरा समोर उभ्या असताना

प्रांत कार्यालयातील काही कर्मचारी पाहणी करणेकरिता आले होते. ते निघून गेल्यावर फिर्यादी उभी असताना शेजारचे आरोपी यशवंत मुदगूल व त्यांची पत्नी कांता मुदगूल हे फिर्यादीस म्हणाले,
तु आमचे विरुध्द का तक्रार करतेस? असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करु लागले, तेव्हां फिर्यादीने शिवीगाळ करु नका असे म्हणत असताना आरोपीने जवळ येवून धक्काबुक्की करीत फिर्यादीच्या गळ्याला धरले व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच आरोपी कांता मुदगूल हिने फिर्यादीचे केस धरुन तिथे पडलेल्या लाकडी काठीने पाठीत मारले. यावेळी फिर्यादी जोर जोराने ओरडल्यानंतर आवाज ऐकून शेजारी राहणारे प्रतिक किल्लेदार व गणेश धोत्रे घटनास्थळी धावून आले व त्यांनी भांडणे सोडविल्यानंत आरोपी तेथून निघून गेले.

दरम्यान या भांडणात फिर्यादीच्या उजव्या कानातील टॉप्स पडून गहाळ झाले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










