टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील करकंब व बार्डी येथील शेतकऱ्यांनी ऑक्टोबर छाटणीअगोदर आपल्या द्राक्षबागेतील तणावर फवारणी केल्यानंतर दीड महिना उलटून गेला तरी
शेतकऱ्यांनी पिकाची छाटणी केल्यानंतर त्यांच्या बागा फुटल्या नाहीत. यामुळे त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
या शेतकऱ्यांच्या नुकसानीला मॉडर्न ॲग्रीजेनिटिक्स लि. इंदूर (मध्य प्रदेश) या कंपनीला जबाबदार धरून वितरक ओंकार कृषी केंद्राविरोधात करकंब पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
शेतकऱ्यांनी ऑक्टोबर छाटणीअगोदर १० ते १५ दिवस अगोदर तणनाशक फवारणी केली होती. त्यामुळे आमची द्राक्ष फुटली नाही.
सध्या बागेत एकही काडी तयार नसल्यामुळे नुकसान झाले असल्याचे म्हटले होते. त्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे व तालुका कृषी अधिकारी भागवत व त्यांच्या पथकांनी ५ नोव्हेंबर रोजी ओंकार कृषी केंद्र (करकंब ) या दुकानाची तपासणी केली.
मॉडर्न अॅग्रीजेनिटिक्स कंपनीवर महाराष्ट्रात कीटकनाशक उत्पादन व विक्रीचा परवाना निर्गमित केला नसताना महाराष्ट्रात विक्री केली आहे.
म्हणून ओंकार कृषी केंद्र चालक संजय राजाराम पवार (रा. करकंब ) यांनी ग्लायफोसेट ४१ हे तणनाशक विक्री केले.
हे औषध करकंब व बार्डी येथील शेतकऱ्यांनी ऑक्टोबर छाटणीअगोदर १० ते १५ दिवस फवारणी केले. यामुळे छाटणीनंतर द्राक्षबाग फुटली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान व महाराष्ट्र शासनाची फसवणूक झाली.
पोलीस अन् कृषी विभागाची संयुक्त कारवाई…
यामुळे जिल्हा गुणवत्ता निरीक्षक कृषी विभाग धनंजय पाटील यानी ती कंपनी व औषध विक्रेता यांच्या विरोधात करकब पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सपोनि नीलेश तारू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजित मोरे व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कृषी व तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल बापू मोरे, आर.आर. जाधव, अभिजित कांबळे यांच्यासह पोलिस व कृषी विभाग याच्या संयुक्त विद्यमाने सुरु आहे.
पुण्यात तपासणी.. अहवालानंतर कारवाई
औषध विक्री दुकानातून महाराष्ट्रात विक्री परवाना नसलेले मॉडर्न अॅग्रीजेनिटिक्स या कंपनीचे ग्लायफोसेट ४१ या तणनाशकाच्या एक लिटरच्या ४ बाटल्या विक्रीसाठी मिळून आल्या. ते तणनाशक विक्रीसाठी कोणताही परवाना दुकानदाराकडे नव्हता. यातील तीन बाटल्या सीलबंद करून तपासणीसाठी ताब्यात घेतल्या.
त्यातील एक बाटली पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल कृषी अधिकान्यांनी १० नोव्हेंबर रोजी जिल्हा कृषी अधीक्षकांना पाठविला होता. या अहवालानुसार कंपनी व दुकानदार यांनी कीटकनाशक अधिनियम १९६८ मधील नियमाचा भंग केल्याचे दिसून आले.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज