मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
वहिवाटीचे रस्ते अडवल्यानंतर तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्षानुवर्ष रस्ता मागणीचे खटले चालत असतात.
सदरचे खटले तात्काळ निकाली काढण्यासाठी कालमर्यादा ठरवून त्वरित या तक्रारींचा निपटारा करून शेतकऱ्यांना होणारा नाहक त्रास वाचवावा. अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी विधीमंडळ अधिवेशनामध्ये केली.
पंढरपुरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या मेहतर समाजातील कर्मचाऱ्यांना त्वरित घरे उपलब्ध करून देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करावा. रस्ते गटारी अपुरा पाणीपुरवठा असे अनेक कामे पंढरपूर मध्ये झाले असून यावर सुमारे पाचशे कोटी खर्च झाले आहेत.
तरीही हे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे हा निधी गेला कुठे, याची माहिती उपलब्ध करून घ्यावी. पंढरपूर शहरातील जिजामाता व पद्मावती उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा.
पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणातील सिटी सर्वे नंबर ४०७५ /१/अ/१ क्षेत्रफळ ९६६.५६ चौरस मीटर ३५३४ नंबर प्लॉट असून याची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. त्याचा चुकीचा दस्त नोंद करून सदर भूखंड लाटला आहे, हे पोलीस तपासातून उघड झाले आहे.
नगरपालिकेचे अधिकारी व नोंदणी विभागाचे अधिकारी यांना हाताशी धरून सदरचा दस्त खरेदी झाला आहे. याप्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल करावेत. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामध्ये अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी निधीची उपलब्धता करून द्यावी.
पंढरपूर मध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून ती टाळण्यासाठी रिंग रोडचे काम तात्काळ सुरू करावे अशीही मागणी आ. आवताडे यांनी सभागृहात केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज