टीम मंगळवेढा टाईम्स :
सोलापूरकरांच्या जिभेवर रेंगाळणारी चव, फालुद्याचे खरे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आता मंगळवेढा शहरात दाखल झाले आहे.
मंगळवेढावासीयांच्या हक्काच्या खवय्येगिरीसाठी आजपासून दामाजी रोड येथे या नूतन शाखेचा शुभारंभ झाला असून, ग्राहकांच्या सेवेसाठी हे दालन सज्ज झाले आहे.

काय आहे खास?
आईसक्रीम आणि फालुदा प्रेमींसाठी हे एक नंदनवन ठरणार आहे. ‘हरे कृष्णा’ची खासियत असलेला खास ‘स्पेशल फालुदा’ आणि विविध फ्लेवर्सच्या आईसक्रीमचा अस्सल आनंद आता मंगळवेढ्यात सहज उपलब्ध होणार आहे. दर्जेदार आणि चविष्ट पदार्थांची मेजवानी घेण्यासाठी आता लांब जाण्याची गरज उरलेली नाही.

”आम्ही सोलापूरची तीच चव, तोच दर्जा आणि तोच विश्वास आता मंगळवेढ्यातील आमच्या प्रिय ग्राहकांसाठी घेऊन आलो आहोत. आजपासून सर्वांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत!”- कपिल काकडे, हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर, मंगळवेढा.

आज गुरुवार दि.१२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वा. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मंगळवेढ्यातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कपिल काकडे यांनी केले आहे.

या कार्यक्रमासाठी शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष अॅड.सुजित (बापू) कदम, अ.भा. नाट्य परिषद राज्य नियामक मंडळ सदस्य सौ.तेजस्विनी कदम यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

आजच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि परिवारासोबत भेट द्या आणि थंडगार फालुद्याचा मनसोक्त आस्वाद घ्या!
याप्रसंगी नगराध्यक्षा सौ. सुनंदा (आबी) आवताडे, आवताडे शुगरचेअरमन संजय (मालक) आवताडे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवा. सौ. डॉ. प्रियदर्शनी कदम-महाडिक, विठ्ठल शुगरचे माजी चेअरमन भगिरथ भालके तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहे.

आज होणाऱ्या हरे कृष्णा आईस्क्रीम पार्लर फालुदाचे माहेरघर उद्घाटन प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सचिन भगरे, पवन काकडे, सुमित काकडे, कालिदास काकडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












