टीम मंगळवेढा टाईम्स।
जीबीएस आजाराचे आजपर्यंत सोलापूर शहर -जिल्ह्यात अकरा रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील नऊ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
जीबीएस आजाराबाबत आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. हा आजार नियंत्रणात आहे. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, शिळे व उघड्यावरचे अन्न खाऊ नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे.
आशाताईंच्या माध्यमातून जीबीएस आजाराच्या रुग्णांचा शोध घेतला जात आहे. यासाठी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या निर्देशानुसार जलस्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात येत आहे.
हा आजार सोलापूर शहर – जिल्ह्यात पूर्णतः नियंत्रणात असून, उपचारादरम्यान पुणे व सोलापूर येथील दोन रुग्णांचा सोलापूर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
या आजारावर खर्च महागडा असल्याने महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले.(स्रोत:पुण्यनगरी)
सोलापूर जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या
पंढरपूर – २, अक्कलकोट १, माढा १, बार्शी १, दक्षिण सोलापूर – १, धाराशिव १, पुणे १, कर्नाटक – १ उपचारादरम्यान सोलापूर शहरातील मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या – २
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज