mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

लोकसभेला जसा दणका दिला त्याप्रमाणे विधानसभेला दणका देऊन अनिल सावंत यांना निवडुन द्या; पाण्याचा व शेतीचा प्रश्न स्वतः लक्ष घालून मार्गी लावणार; सुप्रिया सुळेंचा जनतेला शब्द

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 17, 2024
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
लोकसभेला जसा दणका दिला त्याप्रमाणे विधानसभेला दणका देऊन अनिल सावंत यांना निवडुन द्या; पाण्याचा व शेतीचा प्रश्न स्वतः लक्ष घालून मार्गी लावणार; सुप्रिया सुळेंचा जनतेला शब्द

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न बेरोजगारी व महिलांसाठी नवीन योजना याबाबत मी स्वतः लक्ष घालून हे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचा शद्ब सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचार्थ मंगळवेढ्यातील आयोजित सभेत त्या बोलत होत्या.

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राहुल शहा, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख, शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय भोसले, काँग्रेसचे फिरोज मुलाणी, माजी उपनगराध्यक्ष मुजफर काझी, माजी नगरसेवक चंद्रशेखर कोंडूभैरी,  कार्याध्यक्ष संतोष रंधवे, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, जेष्ठ नेते दादासाहेब गरंडे, राजाभाऊ चेळेकर, महिला नेत्या संगीता कट्टे, यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, अनिल सावंत हे आधाराची सावली म्हणून तुमच्या सोबत कायम उभे राहणार आहेत. मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. मला पवार साहेबांनी अनिल सावंत यांच्यासाठी पाठवले आहे.

सोलापूर जिल्ह्यात सध्या एकच नारा घुमतोय राम कृष्ण हरी वाजवा तुतारी. वातावरण बदलत चाललेय आहे.  मंगळवेढा व सोलापूरकरांनी पवार साहेबांना भरभरून प्रेम दिले आहे. सगळ्यात युवा मुख्यमंत्री म्हणून शरद पवार हे झाले होते. ते सोलापूरला आले तेव्हा लोकांनी रस्त्यावरून गुलाबाच्या पाकळ्या टाकून मिरवणूक काढली होती.

मी विठ्ठलाची भक्त आहे. ही संतांची भूमी आहे. अनिल सावंत यांचा पारदर्शक कारभार आहे. त्यामुळे अशा उमदा उमेदवार विधानसभेत गेला पाहिजे.

हा देश कुणाच्या मरजीने चालत नसून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिलेला घटनेवर चालत आहे. सलग पाच वर्षे सरकार आल्यावर महागाई वाढू देणार नसून महिलांसाठी अनेक योजना राबवणार आहे. लोकसभेला जसा दणका दिला त्याप्रमाणे विधानसभेला दणका देऊन अनिल सावंत यांना निवडुन द्या.

भाजप सरकारच्या काळात पाण्याची बाटली वीस रुपयाला व दुधाला 24 रुपये भाव हा कसला अन्याय आहे. सरकार जनतेची लूट करत आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकाला हमीभाव देणार. सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणारा असा आमदार निवडून द्यायला पाहिजे.

त्याचबरोबर सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार,  आमचे सरकार आल्यानंतर मंत्रालय 24 तास जनतेसाठी खुले राहणार. आम्ही सत्तेसाठी मतं मागत नसून शेतकरी, बेरोजगार, महिला यांच्या भविष्यासाठी मत मागत आहे.

बेरोजगारी, महागाई कमी करून महिलांना महिन्याला 3 हजार रुपये देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विठ्ठलाच्या आशीर्वाद अनिल सावंत यांच्या सोबत असून पाच नंबरला तुतारी चिन्ह असून त्या समोरील बटन दाबा असे आवाहन त्यांनी केले.

अनिल सावंत बोलताना म्हणाले की, गेल्या पन्नास वर्षांपासून शरद पवार साहेबांच्या विचारांचा मतदारसंघ आहे. मंगळवेढा-पंढरपूर मधील जनतेची ज्यांनी दिशाभूल केली आशा लोकांना जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे.

आमदार आवताडे यांनी 3 हजार कोटींचा निधी आणला असा खोटा गवगवा करत आहेत. ज्यांनी त्यांना निवडून दिले त्या परिचारक साहेबांना देखील त्यांनी फसवले. भगीरथ भालके यांनी जनतेची दिशाभूल करून खोटा प्रचार सुरू केला. आशा लोकांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. असे लोक मतदारसंघात फिरत आहेत खोटी वेगवेगळे आश्वासन देत आहेत अशा लोकांना जनता त्यांची जागा दाखवून देईल.

मला फक्त विकास करायचा आहे या मतदारसंघाचा शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देण्याची भूमिका पार पाडली असून वेळेवर बिल दिले आहे. गेली 50 वर्ष पाण्यावरून राजकारण करून खोटी आश्वासने देऊन निवडून आले आहेत.

शेतकऱ्यांना हातभार देण्यासाठी नवीन उद्योग सुरू करत आहे. येणाऱ्या काळात तरुणांच्या शिक्षणासाठी मोठे शैक्षणिक संकुल सुरू करणार आहे. बचत गटातील महिलांना घरगुती काम मिळवून देणार आहे.

संत बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारकाचा विषय आजपर्यंत नुसता कागदोपत्री रेंगाळला आहे. एक ही ठोस काम मार्गी लागले नसल्याचा आरोप आणि अनिल सावंत यांनी केला.

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे बोलताना म्हणाले की, काल कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी मंगळवेढा तालुक्यातील जनतेला खोटी आश्वासने देऊन गेले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री मराठी माणसाला शिव्या देत असतात. बेळगावचा मास्टर प्लॅन त्यांनी अडवला आहे. मराठी माणसाची मोठी अडवणूक करत असल्याचा आरोप ढोबळे यांनी केला.

शरद पवार यांनी सर्व समाजाच्या नेत्यांना सोबत एकत्र घेऊन राजकारण केले आहे. आमदार समाधान आवताडे यांनी तीन वर्षाच्या काळात कोणतेच ठोस काम केले नाही.

जनतेच्या प्रश्नसंदर्भात आमदार आवताडे यांनी किती वेळा आवाज उठवला हे त्यांनी सांगावे? त्यांनी दोन नंबरच्या धंद्याबद्दल तक्रार केली पोलीसाविरुद्ध आवाज उठवला. यानंतर कुठला समजोता झाला हे त्यांनी जाहीर करावे. सध्या तर सर्व अवैध धंदे सुरु आहेत. या संदर्भातील त्यांनी खुलासा करावा.

मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना छावणी चालकांचे पैसे घरपोच झाले होते. यांच्या काळात छावणी चालकांची मोठी पिळवणूक सुरु आहे. आद्यप एकही बिल अदा केलेला आहे.

अनिल सावंत यांनी पंधरा वर्षांपूर्वी लवंगीच्या माल रानावरती साखर कारखाना सुरू करून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून दिले असून येणाऱ्या काळात अनेक उद्योग सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनिल सावंतसुप्रिया सुळे

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
Next Post
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

तरुण योद्धा! पंढरपूर-मंगळवेढ्यातुन अनिल सावंत यांना विजयी करा; जनतेला धोका देणाऱ्या गद्दारांना पाडा; खा.शरद पवार यांचे भावनिक आवाहन

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..