मंगळवेढा टाईम्स न्यूज।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यातील काट्याची लढत ही सोलापूर जिल्ह्यात चार नगरपालिकात दिसत आहे. आज एकनाथ शिंदेंच्या सोलापूर जिल्ह्यात तीन ठिकाणी सभा होत आहेत.
ठाणे जिल्ह्यानंतर शिंदे सेनेला अडचणीत आणायचे काम भाजपने सर्वात जास्त सोलापूर जिल्ह्यात केले आहे. त्यामुळे अहंकार जाळण्याचे आवाहन करणारे एकनाथ शिंदे आज सोलापूर जिल्ह्यात काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट , सांगोला, करमाळा आणि मोहोळ या चार नगरपालिका शिंदे सेनेच्या विरोधात भाजप जोरदार ताकतीने उतरली आहे. आज यातील करमाळा वगळता तीन ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा होणार आहेत.

यात एकनाथ शिंदे यांची सर्वात दुखरी नस सांगोला असून येथे शहाजी बापू पाटील यांची सत्ता असलेल्या नगरपालिकेवर त्यांना हटविण्यासाठी
भाजपने शेतकरी कामगार पक्षाशी आणि अजित दादांचे निकटवर्तीय माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्याशी आघाडी केली आहे. यातूनच दुखावलेल्या बापूंनी भाजपवर अत्यंत टोकाची टीका केली होती.

मंत्री जयकुमार गोरेंनी सांगोल्यासह अक्कलकोट मोहोळ आणि करमाळ्यात उभं केलं स्वतंत्र पॅनल
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला अक्कलकोट मोहोळ आणि करमाळा या चारही ठिकाणी स्वतंत्र पॅनल उभा करत शिंदे सेनेला अडचणीत आणले आहे. यातूनच आता एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडताना निशाण्यावर कोण असणार हे आज दिसणार आहे.

अक्कलकोटमध्ये काँग्रेस मधून शिंदे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडे पुन्हा नगरपालिकेची सत्ता आणण्यासाठी शिंदे प्रचारासाठी येत आहेत. येथे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे.
मोहोळमध्ये नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत खरी लढत ही एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप विरुद्ध उबाठा
खरी रंगतदार लढत ही मोहोळ येथे होत असून येथे अजित पवारांची राष्ट्रवादी वगळता पाच पक्षांची उमेदवार नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत. येथे शरद पवार गटाचे आमदार राजू खरे हे उघडपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना उमेदवाराचा प्रचार करत असून अजित दादांचे जिल्हाप्रमुख उमेश पाटील यांनीही आपली ताकद शिंदे यांच्या मागे उभी केली आहे.

मोहोळ तालुक्यातील अनगर येथे संपूर्ण नगरपालिका भाजपने बिनविरोध करून घेतल्यानंतर यावर जोरदार टीका झाली होती. अनगर विषयावर एकनाथ शिंदे काय बोलतात याकडेही लक्ष राहणार आहे. मोहोळ मध्ये नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत खरी लढत ही एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप विरुद्ध उबाठा अशीच रंगली आहे.

करमाळा नगरपालिकेत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेले माजी आमदार जयवंतराव जगताप यांची सत्ता होती. शिंदे गटाची सत्ता खेचण्यासाठी भाजपनेही येथे संपूर्ण ताकद लावली असून अजित पवारांची राष्ट्रवादी ही एकनाथ शिंदे यांच्या विरोधात स्वतंत्र पॅनल करून लढत आहे.(स्रोत:abp माझा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











