टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील बोराळे नाक्यावर असलेले त्रिमुर्ती मशनरी दुकान चोरटयांनी फोडून जवळपास 11 लाख 16 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.
दरम्यान या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. या चोरीच्या घटनेने व्यापारी वर्गातून मोठी खळबळ उडाली आहे.
यातील फिर्यादी गणपती पांडुरंग सोमुत्ते (रा.हुलजंती) यांचे बोराळे नाक्याजवळ बँक ऑफ महाराष्ट्रशेजारी त्रिमुर्ती मशनरी मोटार रिवायडींग विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे.
संध्याकाळी 8.00 वा. दुकानाचे शटर बाहेरून बंद करून फिर्यादी व कामगार घरी गेले. दि.22 रोजी सकाळी 9.00 वा. दुकानाचे मॅनेजर मनोज पाटील हे दुकान उघडण्यासाठी आले असता
त्यांना दुकानाच्या शटरचे लॉक व सीसी टिव्ही कॅमेराच्या वायरी तुटलेल्या दिसल्या. चोरटयांनी शटरला लावलेले कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून दुकानात विक्रीसाठी ठेवलेले
चोरी करताना व्हिडीओ बघा चोरटेकॅमेऱ्यात कैद;-
नवीन तांब्याच्या तारेचे बॉक्स, रोख रक्कम, कॅमेराचा डी.व्ही.डी.आर. असा एकूण 11 लाख 16 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
चोरटयांनी शटर तोडून आत प्रवेश केल्यानंतर प्रथमतः सीसी टिव्हीचा डी.व्ही.डी.आर तोडून काढून आपले चोरीचे काम फत्ते केले. या कॅमेरात दोन चोरटे दुकानातून बॉक्स बाहेर लंपास करीत असल्याचे कॅमेरात कैद झाले आहे.
चोरटयांनी अंगात पांढरे स्वेटर, पँट, तोंडे बांधलेले, डोक्याला टोपी घातलेले दृष्य कॅमेरात दिसत असून अंदाजे पाच चोरटे असावेत असा कयास आहे.
घटनास्थळाला पोलिस निरिक्षक रणजित माने, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देवून घटनेची पाहणी केली.
चोरटयांचा मागोवा घेण्यासाठी सोलापूरहून श्वान पथक मागविण्यात आले होते. श्वान बोराळे नाक्यावरून सोलापूर रोडला गेल्याने चोरटे सोलापूरच्या दिशेने वाहनाने गेले असावेत असा कयास काढला जात आहे.
या चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गातून मोठी खळबळ उडाली असून या चोरीचा तपास करणे पोलिसांना एक आव्हान आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अंकुश वाघमोडे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज