मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मंगळवेढा तालुक्यातील शिरसी येथे दारु पिवून आलेल्या पतीने लहान मुलास मारत असताना त्यांना का मारता? असे म्हणाल्याच्या कारणावरुन पत्नी माधुरी गायकवाड (वय २४)
हिला काठीने बेदम मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी पती समाधान श्रीपती गायकवाड याच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी तथा जखमी पत्नी माधुरी समाधान गायकवाड (वय २४) ही दि.३ रोजी सायंकाळी ७ वाजता घरी असताना आरोपी तथा पती दारु पिवून येवून मुलास मारहाण करीत असताना
फिर्यादीने मुलाला का मारता? असे म्हणाल्याच्या कारणावरुन तु मला विचारणारी कोण? असे म्हणून फिर्यादीचा डावा हात पिरगळून, खाली पाडून, पोटात तसेच छातीवर लाथेने मारहाण केली.
तसेच लाकडी काठी घेवून डाव्या हातावर, डाव्या मांडीवर मारुन गंभीर जखमी केले. तद्नंतर शिवीगाळी करीत तु मध्ये आली तर तुला सोडणार नाही अशी दमदाटी केल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार निंबाळकर हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज