टीम मंगळवेढा टाईम्स।
रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवून सर्वसामान्यांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या हुल्लडबाजांविरुद्ध मंगळवेढा पोलिसांनी आता कडक पाऊले उचलली आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २१ वाहन चालकांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नेमकी कारवाई काय?
गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि परिसरात दुचाकीचे सायलेन्सर काढून किंवा मॉडिफाईड सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. या हुल्लडबाजीमुळे नागरिक त्रस्त होते. पोलिसांनी अशा वाहनांची धरपकड करत ही धडक कारवाई केली आहे.

आकडेवारी धडकी भरवणारी!
वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे होणाऱ्या अपघातांची आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. गेल्या वर्षी केवळ मंगळवेढा तालुक्यात: ४७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ६३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ०६ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

ही भयावह परिस्थिती सुधारण्यासाठी पोलिसांनी आता केवळ दंड न आकारता थेट गुन्हे दाखल करण्याचे धोरण अवलंबले आहे.
पोलिसांचे आवाहन
स्वतः वाहतुकीचे नियम मोडायचे आणि कारवाई झाली की पोलिसांना दोष द्यायचा, ही वृत्ती घातक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. शिस्त लावण्यासाठी यापुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

या पथकाने केली कारवाई
या मोहिमेत मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पीएसआय विजय पिसे, पीएसआय नागेश बनकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी यादव, पोलीस कॉन्स्टेबल सुरज साळुंखे, प्रवीण जाधव, आणि सचिन काळेल यांनी सहभाग घेतला.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











