टीम मंगळवेढा टाईम्स ।
दि.२८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर पर्यंतच सोलापूर शहर जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या वर्गांना दीपावली सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
त्यामुळे आज गुरुवार दि.११ नोव्हेंबर पासून सोलापूर शहरातील आठवी ते बारावी व जिल्हा ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे शाळा वर्ग ऑफलाईन सुरू करण्यात येणार होणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिका भास्कराव बाबर यांनी दिली.
दीपावली सुट्ट्यात वाढ करण्यात येणार अशी चर्चा मध्यंतरी होती. या चर्चेत कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून गुरुवार पासून शहर-जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्याध्यापकांना लेखी स्वरूपात कळविण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण बाबर यांनी दिले आहे.
सोलापूर शहरातील आठवी ते बारावी तर ग्रामीण भागातील पाचवी बारावी पर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात सुरू होणार आहेत.
शाळा सुरू झाल्याने कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनीही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविताना पाल्याची काळजी घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी बाबर यांनी केले आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज