टीम मंगळवेढा टाईम्स ।
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात १ लाख मराठा उद्योजक संख्या पूर्ण झाली आहे. महामंडळाचे १ लाख लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती करण्यात आली आहे.
आणखी मराठा उद्योजकांची संख्या वाढावी. उद्योग व्यवसाय वाढीस लागावेत. या दृष्टिने यानिमित मराठा उद्योजकांचा जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा आणि पंढरपूर उपकेंद्राच्या उदघाटनाचा कार्यक्रम
उद्या दि.२९ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.
महामंडळ योजनांच्या माध्यमातून आजपर्यंत १ लाख ७ हजार २१३ लाभार्थी झाले असून, ८ हजार ९९० कोटी रुपये विविध बँकानी कर्ज वितरित केले आहे. त्यापैकी महामंडळाने ८६७ कोटी रुपये व्याज परतावा केला आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजने अंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या बँकांचा सत्कार व तसेच नाविन्य पूर्ण व्यवसाय करर्णाया लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
दि. २९ रोजी मेळावा व पंढरपूर येथील उपकेंद्र उद्घाटनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. समाधान आवताडे, त्याचबरोबर जिल्ह्यातील आमदार उपस्थित असणार आहेत.
उपकेंद्र उदघाटन सकाळी १० वा. हॉल क्र.७, इंदिरा गांधी चौक, शॉपिंग सेंटर, लोकमंगल बँकेच्या शेजारी पंढरपूर या ठिकाणी होणार आहे. तर मेळावा सकाळी १०.३० वाजता श्रीयश पॅलेस, कोर्टी रोड पंढरपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज