मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे आज गुरुवारपासून पुढील पंधरा दिवसांच्या प्रदिर्घ रजेवर जाणार आहेत.
त्यांचा पदभार सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे जंगम हे पंधरा दिवस जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना दि.२१ जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. जिल्हाधिकारी अथवा महापालिका आयुक्त किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
हे प्रदीर्घ रजेवर जात असतील, तर समकक्ष दर्जाप्रमाणे आयुक्त पदाचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे येऊ शकतो.
किंवा जिल्हाधिकाऱ्यांचा पदभार पालिका आयुक्ताकडे जिल्हा परिषदेच्या सिईओंकडे देण्यात येतो.
जिल्हाधिकारी आशिर्वाद हे खासगी कामानिमित्त रजेवर आहेत. त्यामुळे त्यांनी पदभार सीईओ जंगम यांच्याकडे सोपवला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज